पालिका निवडणूक स्वबळावर लढू

By admin | Published: July 10, 2016 04:50 AM2016-07-10T04:50:08+5:302016-07-10T04:50:08+5:30

महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष ही पदे राष्ट्रवादीकडेच असतील. काँग्रेसला आमच्याबरोबर यायचे नसेल तर त्यामुळे

The municipal election will fight on its own | पालिका निवडणूक स्वबळावर लढू

पालिका निवडणूक स्वबळावर लढू

Next

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष ही
पदे राष्ट्रवादीकडेच असतील. काँग्रेसला आमच्याबरोबर यायचे नसेल तर त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असा विश्वास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीने मागील पाच वर्षांत आमची फसवणूक केली या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘आम्ही कसलीही फसवणूक केलेली नाही. या वेळी उपमहापौरपद त्यांना द्यावे लागले, पुढील वेळी मात्र तशी आवश्यकताही भासणार नाही. महत्त्वाची तिन्ही पदे आमच्याकडेच असतील. ते बरोबर नसतील तर काहीही फरक पडणार नाही. पक्षाने मागील १० वर्षांत जनहिताची अनेक कामे केली आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीमध्ये पुण्याची निवड झाली. त्याच कामाच्या बळावर राष्ट्रवादी पालिकेत पुन्हा सत्तास्थानी असेल.’’
नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात काम सुरू केले आहे. पक्षीयस्तरावरही निवडणुकीची सज्जता सुरू आहे, असे वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले. या माध्यमांमधून प्रश्न उपस्थित
करून त्यावर नागरिकांना उत्तरे
देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
आहे. यामधून पक्षाला उपयोग
होईल, अशी खात्री चव्हाण यांनी व्यक्त केली. या पंचवार्षिकच्या सुरूवातीला नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठीही प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे पाच वर्षानंतर त्यांना समजू शकतील अशा गोष्टी सुरूवातीलाल समजल्या. त्याचा विकासकामांचा पाठपुरावा करण्यास मदत झाली. यावेळेपासून मतदारांचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. समाजातील सर्वात अखेरच्या घटकासाठीही काम करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण आहे. पक्षाचे सर्व नगरसेवकत्याच उद्देशाने कार्यरत असतात. त्याचाच उपयोग राष्ट्रवादीला पालिकेच्या येत्या निवडणुकीत होणार आहे असे चव्हाण यांनी सांगितले.

समाजातील वेगवेगळ्या घटकांना पक्षाकडे आकृष्ट करण्याचे काम सुरू आहे. त्यादृष्टीने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच कार्यकर्त्यांसाठीही सोशल मीडियाचा वापर, नागरिकांच्या कामांना प्राधान्य कसे द्यायचे याचे वर्ग सुरू आहेत. त्यात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन देण्यात येते. त्याचा पक्षाला निश्चित उपयोग होईल.
- वंदना चव्हाण

Web Title: The municipal election will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.