महापालिका निवडणुकीत आपल्याच विचाराची सत्ता असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:19+5:302021-02-08T04:10:19+5:30

धनकवडी : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याच विचाराची एक हाती सत्ता असेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. ...

Municipal elections will have the power of your own thinking | महापालिका निवडणुकीत आपल्याच विचाराची सत्ता असेल

महापालिका निवडणुकीत आपल्याच विचाराची सत्ता असेल

Next

धनकवडी : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याच विचाराची एक हाती सत्ता असेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या विकास निधीतून तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले.

दत्तनगर चौक ते शनीनगर चौक दरम्यान १८ मीटर रुंदीचा रस्ता रुंदीकरण, सक्षमीकरण आणि रोहित्रांचे स्थलांतरण व भूमिगत वीज वाहिन्या नव्याने टाकणे आदी विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजित केले होता. नगरसेविका स्मिता कोंढरेंनी विकास कामांचा लेखाजोखा मांडत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्या जागा मालकांनी आपल्या जागा रस्ता रुंदीकरणासाठी दिल्या ते जागा मालक गिरीश पवार, संतोष शिंगवी, अक्षय निगडे, सोहम शर्मा यांचा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सुरेश कदम, विकास दांगट, अक्रूर कुदळे, काका चव्हाण, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, महेंद्र कोंढरे, नगरसेविका अमृता बाबर उपस्थित होते. जनहित विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष सुधीर कोंढरे यांनी आभार मानले.

कोट

दत्तनगर ते शनिनगर जांभूळवाडी रस्ता हा प्रचंड रहदारीचा असून येथे मोठ्या प्रमाणात कष्टकरी व कामगार वर्ग राहतो. त्यातच या रहदारीच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. सर्व सामान्यांंना या वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी या कामाला प्राधान्य दिले आहे. हाती घेतलेली सर्व विकास कामे वर्षभरात तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

- स्मिता कोंढरे, नगरसेविका

फोटो : नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या विकास निधीतून तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले.

Web Title: Municipal elections will have the power of your own thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.