हडपसर येथील महापालिकेचा कचरा प्रकल्प दहा दिवस राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:22 PM2018-03-10T13:22:12+5:302018-03-10T13:22:12+5:30

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले.त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली.

municipal garbage project close for ten days at hadpsar | हडपसर येथील महापालिकेचा कचरा प्रकल्प दहा दिवस राहणार बंद 

हडपसर येथील महापालिकेचा कचरा प्रकल्प दहा दिवस राहणार बंद 

Next
ठळक मुद्देकंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे.

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील पुणे महानगरपालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पास आग लागल्याने कचऱ्यावर  प्रक्रिया करणाऱ्या  मशीन जळाल्याने  काम थांबले आहे. त्यामुळे किमान पुढील दहा दिवस हा प्रकल्प बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या ३५०  टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. 
प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक केंद्राच्या पाच गाड्यांनी दिवसभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे  महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 
        कंपनीचे संचालक योगेश देशमुख म्हणाले, या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत अद्ययावत मशीन जळाल्या आहेत. याबाबत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जळालेले अनेक प्रक्रिया साहित्य इंपोर्टेड आहे, त्यामुळे ते आणण्यास उशीर होणार आहे. जळालेले कनव्हेअर व बेल्ट चेन्नईयेथून आणले जाणार आहे. त्यामुळे  न होणाऱ्या  कचऱ्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. 
याबाबतहडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील पुणे महानगरपालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पास आग लागल्याने कचऱ्यावर  प्रक्रिया करणाऱ्या  मशीन जळाल्याने  काम थांबले आहे. त्यामुळे किमान पुढील दहा दिवस हा प्रकल्प बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या ३५०  टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. 
प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक केंद्राच्या पाच गाड्यांनी दिवसभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कंपनीतील विविध मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे  महापालिकेला प्रकल्प बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 
        कंपनीचे संचालक योगेश देशमुख म्हणाले, या आगीत सुमारे पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत अद्ययावत मशीन जळाल्या आहेत. याबाबत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जळालेले अनेक प्रक्रिया साहित्य इंपोर्टेड आहे, त्यामुळे ते आणण्यास उशीर होणार आहे. जळालेले कनव्हेअर व बेल्ट चेन्नईयेथून आणले जाणार आहे. त्यामुळे  न होणाऱ्या  कचऱ्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. 
याबाबत घनकचरा विभागाचे प्रमुखे सुरेश जगताप म्हणाले, किमान पुढील दहा दिवसात प्रकल्पाची दुरूस्ती करून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत. तोपर्यंत कंपनीच्या आवारील रँम्पवर कचरा साठविण्यात येत आहे.म्हणाले, किमान पुढील दहा दिवसात प्रकल्पाची दुरूस्ती करून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत. तोपर्यंत कंपनीच्या आवारील रँम्पवर कचरा साठविण्यात येत आहे.

Web Title: municipal garbage project close for ten days at hadpsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.