महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:23+5:302021-09-24T04:11:23+5:30

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या ...

Municipal group leaders claim victory | महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

Next

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरी गेली तरी आपल्याला संधी निश्चित मिळेल या आशेने अनेकांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे.

चौकट

सध्याची पालिकेतील स्थिती (नगरसचिव कार्यालयातील नोंद)

भाजप : ९७

राष्ट्रवादी काँग्रेस : ४२

काँग्रेस : १०

शिवसेना : १०

मनसे : २

एआयएमआयएम : १

( दोन जागा रिक्त (दिवंगत सदस्य))

चौकट

१६६ ते १६८ नगरसेवक

“नवीन तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शहरात साधारणतः ५५ ते ५६ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १६६ ते १६८ होणार आहे. एका प्रभागात सुमारे ५४ ते ६३ हजार मतदार राहणार असून, प्रत्येकाला तीन उमेदवारांना मतदान करायचे आहे.

चौकट

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

“राज्य सरकारने तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यंत अनुकूल स्थिती भारतीय जनता पक्षासाठी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन सदस्यांचा प्रभाग व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. २०२२ च्या निवडणुकीत 'अब की बार सौ पार ' असेच चित्र निश्चित पाहायला मिळेल.”

-गणेश बिडकर, भाजपा

-----

“तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन, येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल व महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल.”

-दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी

------

“सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना काँग्रेस महापालिकेत सत्तेवर आली होती. यावेळीही तीनचा प्रभाग रचना झाल्याने आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून महापालिकेत पुन्हा काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास आहे.”

-आबा बागूल, कॉंग्रेस

------

“२००२ च्या निवडणुकीत तीनचा प्रभाग असताना शिवसेनेला २१ जागा मिळाल्या होत्या. आता पुन्हा तीनचा प्रभाग झाल्याने शिवसेनेला शहरात चांगले यश मिळेल असा विश्वास आहे. महाविकास आघाडीने तीनचा प्रभाग केल्याचे आम्ही स्वागत करतो.”

-पृथ्वीराज सुतार, शिवसेना

------

“दोन सदस्यीय प्रभाग असताना मनसेचे २८ नगरसेवक महापालिकेत होते. तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे आम्ही स्वागत करतो, ही रचना नक्कीच मनसेची संख्या शहरात वाढवेल व पुण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच ठरवेल.”

-साईनाथ बाबर, मनसे

--------

Web Title: Municipal group leaders claim victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.