पाणी साठविण्यासाठी पालिकेचा पुढाकार

By admin | Published: May 13, 2016 01:36 AM2016-05-13T01:36:05+5:302016-05-13T01:36:05+5:30

शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जात असल्याच्या पार्र्श्वभूमीवर महापालिकेच्या ७५ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

Municipal initiatives for water harvesting | पाणी साठविण्यासाठी पालिकेचा पुढाकार

पाणी साठविण्यासाठी पालिकेचा पुढाकार

Next

पुणे : शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जात असल्याच्या पार्र्श्वभूमीवर महापालिकेच्या ७५ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार असून, त्यातून भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेसाठी पुढाकार घेऊन नागरिकांपुढे आदर्श उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या ७५ इमारती शहरांमध्ये आहेत, त्या सर्व इमारतींवर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. याकरिता १ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिली. या वेळी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. शहरामध्ये मागील वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने यंदा पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेत. शहराला गेल्या ८ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने त्यांनी बोअर घेतले आहेत. बोअरच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात
उपसा होत असल्याने जमिनीखालील पाण्याची पातळी वेगाने घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
>पाण्याचा वापर स्वच्छतागृहांसाठी
अंदाजपत्रकामध्ये पालिकेच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसविणे आणि शहरात बोअरवेल करण्याच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. येत्या जून अखेरपर्यंत शहरात ७५ ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इमारतींच्या छतावर पडणारे पाणी गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे, ते पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी व्यवस्था करणे आदी कामे याअंतर्गत केली जाणार आहेत. बोअरवेलमध्ये पाणी सोडल्याने भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होऊन पाण्याची वाढ होणार आहे. या पाण्याचा वापर प्रामुख्याने महापालिकेच्या स्वच्छतागृहांमध्ये करण्यात येणार आहे.

Web Title: Municipal initiatives for water harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.