महापालिकेच्या विधी सल्लागार मंजूषा इधाटे लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:22+5:302021-06-16T04:13:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेकडून देण्यात येणारा टीडीआर हा नेहमीच वादाचा विषय ठरत आला आहे. याचप्रकरणी लाच लुचपत ...

Municipal Legal Adviser Manjusha Idhate caught in bribery trap | महापालिकेच्या विधी सल्लागार मंजूषा इधाटे लाचलुचपतच्या जाळ्यात

महापालिकेच्या विधी सल्लागार मंजूषा इधाटे लाचलुचपतच्या जाळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेकडून देण्यात येणारा टीडीआर हा नेहमीच वादाचा विषय ठरत आला आहे. याचप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने थेट महापालिकेत सापळा रचून विधी सल्लागार मंजूषा इधाटेला ५० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार मिळाल्यानंतर, दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अवघ्या ४ तासांत सापळा लावून कारवाई संपूर्णपणे यशस्वी करण्यात आली. विधी सल्लागार मंजूषा सतीश इधाटे (वय ५७) असे अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाई पाठोपाठ मंजूषा इधाटेच्या कोथरूडमधील घराची झडती सुरू करण्यात आली आहे.

टीडीआर प्रकरणाची फाईल अभिप्राय देऊन पुढे पाठविण्यासाठी तक्रारदार यांनी विधी सल्लागार मंजूषा इधाटेची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची तातडीने पडताळणी केली. त्यात इधाटेनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेच्या जुन्या इमारतीतील इधाटेच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना इधाटेला रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. इधाटेच्या कोथरूडमधील घरी पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Web Title: Municipal Legal Adviser Manjusha Idhate caught in bribery trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.