महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:17 PM2018-05-04T16:17:33+5:302018-05-04T16:17:33+5:30

महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयाची स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे.

municipal offices are cleaning and ' smart ' | महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’ 

महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’ 

Next
ठळक मुद्दे‘झिरो पेन्डन्सी’ व फाईलच्या वर्गीकरणाचे काम जोमाने सुरुकागदपत्राचे अ,ब,क,ड अशी वर्गीकरण करून मुदत संपलेली प्रकरणे निर्लेखित करण्याचे काम सुरु झिरो पेन्डन्सीबाबत लवकरच कर्मचारी, अधिका-यांचे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार

पुणे:  फाईलचे साठलेले ढिग, अस्ताव्यस्त पसरलेले कागदपत्रांचे गठ्ठे, धूळ खात व जळमटांमध्ये पडलेल्या फाईल्स, बंद संगणक, मोडक्या टेबल, खुर्च्या हे महापालिकेच्या कार्यालयातील चित्र हळूहळू बदलत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सर्व कर्मचारी कार्यालय स्वच्छतेमध्ये व्यस्त असून, गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या कागदपत्राचे वर्गीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. यामुळे सध्या महापालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये लाल, पिवळया,हिरव्या रंगाचे गठ्ठे सर्वत्र दिसत आहेत. 
कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की,  फाईलींचा असलेला ढिग, अस्ताव्यस्त पसरलेले गठ्ठे, फाईलींवर पडलेली जळमटे आणि धूळ असेच चित्र समोर येते. पूर्वीपासून सरकारी कार्यालयांमध्ये एखादी फाईल शोधणे म्हणजे कठीण काम. शंभर फाईली शोधल्यानंतर हवी असलेली फाईल मिळते. फाईलींची रचना करावी, त्यासाठी कार्यपध्दत आखावी. हा विचार कधी करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या दाखल झालेल्या फाईलींची प्रकरणे निकाली झाल्यानंतर याचा पुन्हा ढिग लावला जात होता. हीच परिस्थिती पुणे महापालिकेमध्ये देखील आहे. यामुळेच गेल्या अनेक दशकांपासून येथे फाईलस, कागदपत्राचे वर्गीकरणच करण्यात आलेले नाही. यामुळे काही ठराविक कालावधीनंतर नष्ट करावयाचे कागद, फाईलचे ढिग साठले आहेत. परंतु महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयाची स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. यामुळेच सध्या महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम जोरात सुरु आहे.    
शासनाने आता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये ‘झिरो पेन्डन्सी’ उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेमध्ये देखील याची सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात सर्व कागदपत्रे व फाईल्सचे वर्गीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये प्रत्येक टेबलवर असलेल्या कागदपत्राचे अ,ब,क,ड अशी वर्गीकरण करून मुदत संपलेली प्रकरणे निर्लेखित करण्याचे काम सुरु आहे.
------------------------
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कार्यालयांमध्ये बरेच साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. हीच परिस्थिती सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये देखील आहे. फाईल व्यवस्थित लावलेल्या नाहीत, बंद संगणक, प्रिंटर कोप-यात पडलेले असे एकूणच मरगळ आलेले वातावरण सर्वत्र आहे. कर्मचा-यांना काम करण्यासाठी उत्साही वातावरण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘झिरो पेन्डन्सी’ सोबतच कार्यालय स्वच्छतेची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. झिरो पेन्डन्सीबाबत लवकरच कर्मचारी, अधिका-यांचे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार आहे.
- सौरभ राव, महापालिका आयुक्त

Web Title: municipal offices are cleaning and ' smart '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.