ऑक्सिजन वहन सुरक्षित ठेवण्याबाबतचे महापालिकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:18+5:302021-04-23T04:12:18+5:30

पुणे : नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी, रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. ...

Municipal orders regarding safe conduct of oxygen | ऑक्सिजन वहन सुरक्षित ठेवण्याबाबतचे महापालिकेचे आदेश

ऑक्सिजन वहन सुरक्षित ठेवण्याबाबतचे महापालिकेचे आदेश

Next

पुणे : नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी, रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. तसेच रुग्णालयांतर्गत ऑक्सिजन साठवणूक व ऑक्सिजनचे वहन सुरक्षित पध्दतीने करण्याबाबत खबरदारी घ्यावी़ अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत़

शहरातील खासगी रुग्णांलयांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही या पत्रात नमूद केले आहे. पुणे महापालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवण यंत्रणा, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा व ऑक्सिजन संबंधित इतर सर्वबाबी सुरक्षित व सुस्थितीत असल्याबाबत त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे. तसेच त्या ऑडिटचा अहवाल पुणे महापालिकेस सादर करावा असेही नमूद करण्यात आले आहे़

Web Title: Municipal orders regarding safe conduct of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.