नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:39+5:302021-09-05T04:14:39+5:30

बारामती: नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांच्या वेतनाचा व निवृत्तिवेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. भविष्यात ...

Municipal Primary Teachers | नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचा

नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचा

googlenewsNext

बारामती: नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांच्या वेतनाचा व निवृत्तिवेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. भविष्यात नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचे पगार १०० टक्के शासन अनुदानातून व्हावेत, याकरिता शिक्षक संघ पाठपुरावा करीत असल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने याबाबत विनंती केली होती. त्यानुसार ३ सप्टेंंबर रोजी नगरपरिषद प्रशासन संचनालय संचालकांनी ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिकांनी सहाय्यक अनुदान रक्कम म्युन्सिपल कौन्सिल प्रायमरी स्कूल फंड यांच्याकडे धनादेशाद्वारे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे दरमहा वेतन व निवृत्तिवेतन यासाठी शासन अनुक्रमे ८० टक्के व ९० टक्के अनुदान देते. उर्वरित २० टक्के व १० टक्के सहाय्यक अनुदान नगरपालिकांना त्यांच्या उत्पन्नातून द्यावे लागते. गेले वर्षभर राज्यातील बऱ्याच नगरपालिकांनी सहाय्यक अनुदान वेळेवर जमा केले नाही. तसेच वेतनासाठी आलेल्या अनुदानाचा विनियोग अन्य बाबींवर केला. त्यामुळे काही ठिकाणी प्राथमिक शिक्षकांचे वेतन सहा महिन्यांसाठी थकले. ही अनियमितता गंभीर स्वरूपाची असल्याने यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव यांनी ७ जुलै २०२१ रोजी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचनालय आयुक्तांना निवेदन देऊन सहाय्यक अनुदान जमा करणेबाबत नगरपालिका प्रशासनास आदेश व्हावेत, अशी मागणी केली. या कामी सोलापूर जिल्हा नपा मनपा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गुरुसिद्ध कोरे यांनी पाठपुरावा केला.त्याला यश आले आहे.

Web Title: Municipal Primary Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.