महापालिकेच्या मिळकतींची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:46+5:302021-08-19T04:15:46+5:30
पुणे : महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे ...
पुणे : महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी संबंधित खात्यांना दिले आहेत.
मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. यापूर्वी महापालिकेच्या भवन विभागामार्फत २६६ मिळकती भाड्याने दिल्या आहेत. जवळजवळ १ हजार ६२५ भाड्याने दिलेल्या मिळकतींची गेल्या वर्षी मार्च अखेरची थकबाकी ३४ कोटी ४८ लाख रुपये इतकी आहे. या वर्षी एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ अखेरची भाड्याची थकबाकी १८ कोटी ९२ लाख रुपये इतकी होते. महापालिकेच्या एकूण १ हजार ९८१ भाड्याने दिलेल्या मिळकतींची भाड्याची थकबाकी एकूण ५३ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे़ त्यामुळे ज्या मिळकतींच्या भाड्याची वसुलीच होत नाही, अशा सर्व मिळकती शोधून काढण्याबाबत रासने यांनी प्रशासनास सांगितले आहे़
-----