पहिल्या तिमाहीत महापालिकेचे उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:22+5:302021-06-21T04:09:22+5:30
यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून तिसऱ्या ...
यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून तिसऱ्या लाटेचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात पालिकेला ४ हजार ६७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर, ४ हजार ६६७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यंदा ८ हजार ३६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आलेले असले, तरी साडेपाच हजार कोटी रुपयेच उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.
प्रशासनाने अंदाजपत्रक मांडताना सुचवलेली करवाढ रद्द करण्यात आली आहे. तसेच प्रामाणिक करदात्यांना करामध्ये सूट दिल्याने उत्पन्न आणखी घटले आहे. पालिका आणि पीएमपीएमएलच्या कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ६५० कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर वाढत असल्याने खर्च वाढला आहे.
----/----
मागीलवर्षीच्या तुलनेत १ हजार २०० कोटी रुपयांनी महसुली खर्च वाढला असून, तो ४ हजार ३०० कोटी रुपयांवर जाणार आहे. त्यामुळे पालिकेकडे भांडवली कामासाठी जेमतेम बाराशे ते तेराशे रुपये उपलब्ध होणार आहेत.