आंतरराष्ट्रीय कचरा व्यवस्थापनात पालिकेची शाळा देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:07+5:302021-04-12T04:10:07+5:30
कचरा व्यवस्थापनाचे संस्कार बालवयात व्हावे याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सहा टप्प्यांमध्ये ही स्पर्धा झाली. कचरा वर्गीकरण ...
कचरा व्यवस्थापनाचे संस्कार बालवयात व्हावे याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सहा टप्प्यांमध्ये ही स्पर्धा झाली. कचरा वर्गीकरण खेळ म्हणजे ओला कचरा, वैद्यकिय कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादींबाबत मुले शिकली. दुर्विजय निषाद या विद्यार्थ्याचा 'इको फ्रेंडली सॅनिटायझर हॅन्डस्टॅण्ड' याचे विशेष कौतुक झाले.
तसेच कागदी लगद्याच्या डस्टबिन वाखाणण्यात आल्या. नाटिका, खेळ, बायोगॅस प्रकल्प भेट, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या मुलाखती, ऑनलाइन सर्वेक्षण प्रश्नावली व प्रशस्तिपत्र, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखती व विद्यार्थी मार्गदर्शन वर्ग आदी उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आले. हे सर्व उपक्रम एकत्रित करून स्पर्धा समन्वयकांकडे दिल्ली येथे पाठवण्यात आले.
शिक्षिका पूनम राजगे यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून कार्य केले. मुख्याध्यापिका निगडे, मेथा, सुतार, भोसले सर यांनी विशेष सहकार्य केले. राष्ट्रीय पातळीवर पुणे महानगरपालिकेच्या शाळांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच विविध गटात प्रावीण्य मिळविल्याबद्दल सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे मनपाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी विभागाच्यावतीने अभिनंदन केले.
या स्पर्धेत शाळा क्र. २ बी, नेताजी पालकर मॉडेल स्कूल, विद्यानिकेतन शाळा क्र. १४ खुळेवाडी, सम्राट अशोक विद्यामंदिर मनपा शाळा क्र. ११७ बी कर्वेनगर आणि संत गाडगेमहाराज मनपा शाळा क्र. ८२ माध्यमिक कोंढवा खुर्द या शाळांनी सहभाग घेतला होता.