पालिका शाळा सुरू; विद्यार्थी मात्र गायब!

By Admin | Published: February 5, 2016 02:23 AM2016-02-05T02:23:53+5:302016-02-05T02:23:53+5:30

महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मुंबईला गेल्याने महापालिकेच्या ३६ शाळांना टाळे लावण्यात आले होते.

Municipal school starts; Student disappeared only! | पालिका शाळा सुरू; विद्यार्थी मात्र गायब!

पालिका शाळा सुरू; विद्यार्थी मात्र गायब!

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मुंबईला गेल्याने महापालिकेच्या ३६ शाळांना टाळे लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण मंडळाने गुरुवारी सर्व शाळा पुन्हा सुरू केल्या. मात्र, शिक्षकांकडून अधिवेनाला जाण्यापूर्वी मुलांना पुढील सोमवार ( दि. ८) पर्यंत शाळेत न येण्याच्या सूचना दिल्याने या शाळांमध्ये मुलांची संख्या रोडावलेली होती. तर अनेक शाळांमध्ये एकाच वर्गात तीन ते चार तुकड्या एकत्र करून अध्यपन सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, शिक्षण मंडळाने नोटीस बजावूनही अद्याप कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून किती शिक्षक अधिवेशनाला गेले आहेत आणि शाळा का बंद ठेवण्यात आल्या आहेत याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन येत्या शनिवारी (दि. ६) रोजी नवी मुंबईत होणार आहे. या अधिवेशनास जाण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी अवघे तीन तास लागत असताना पुण्यातील शिक्षकांनी मात्र, मंगळवारपासूनच शाळेला दांड्याा मारल्या आहेत. तर मुलांना अधिवेशन असल्याने आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात येणार असून पुढील आठवड्यातच शाळेत येण्यास बजावले आहे. ही बाब बुधवारी समोर आल्यानंतर शिक्षण मंडळाने तातडीने दखल घेत सर्व मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावत आज पासून तत्काळ शाळा सुरू करण्याच्या नोटिसा बजाविल्या. त्यामुळे अनेकांनी आपल्या सुट्या रद्द करून शाळा उघडल्याही; मात्र मुलेच नसल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक बसून होते.
बहुतांशी शाळांना टाळे
-वृत्त/७

Web Title: Municipal school starts; Student disappeared only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.