महापालिकेच्या शाळा सुरू, उपस्थिती ५० टक्क्यांच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:17+5:302021-01-08T04:34:17+5:30

पुणे : महापालिकेच्या सर्व म्हणजे ४४ शाळांसह शहरातील खासगी २३५ माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी, अद्यापही शाळांमधील विद्यार्थ्यांची ...

Municipal schools started, attendance within 50 percent | महापालिकेच्या शाळा सुरू, उपस्थिती ५० टक्क्यांच्या आतच

महापालिकेच्या शाळा सुरू, उपस्थिती ५० टक्क्यांच्या आतच

Next

पुणे : महापालिकेच्या सर्व म्हणजे ४४ शाळांसह शहरातील खासगी २३५ माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी, अद्यापही शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांच्या आतच आहे़

शाळा सुरू करताना घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे़ पण कोरोना चाचण्यांची मर्यादा व प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास लागणारा कालावधी विचार करता, शहरातील ५२९ माध्यमिक शाळांमधील सुमारे सोळा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत निम्म्या जणांची तपासणी झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली़

पुणे महापालिकेच्या ४४ माध्यमिक शाळांपैकी सर्व शाळा सुरू झाल्या असून, सध्या ३६ टक्के पालकांनीच आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची संमतीपत्रे दिली आहेत़ त्यामुळे आजअखेर शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ३ हजार ७५० इतकी मर्यादित राहिली आहे़ महापालिकेच्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची संख्या ८ हजार ६०० आहे़

--------------------

१२ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

पुणे महापालिकेच्या ४४ शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी पूर्ण झाली असून, यामध्ये केवळ १२ शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत़

==========================

Web Title: Municipal schools started, attendance within 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.