महापालिकांनी अल्ट्रा मॉडर्न ट्रॅकसाठी जागा राखून ठेवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:45+5:302021-02-08T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारत सरकारला अल्ट्रा मॉडर्न ट्रॅक निर्माण करायचे होते. तर त्यांनी देशातल्या महापालिकांना सांगून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारत सरकारला अल्ट्रा मॉडर्न ट्रॅक निर्माण करायचे होते. तर त्यांनी देशातल्या महापालिकांना सांगून ॲमिनिटी स्पेसमध्ये त्यासाठी जागा राखून ठेवायला पाहिजे होत्या. वाहनांमध्ये होत असलेल्या अत्याधुनिक बदल व ड्रायव्हरलेस वाहन येत आहेत. अशा परिस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कुलने भांडवली गुंतवणुक करावी का अशा प्रकारे प्रस्तावित कायद्याचे नियम करताना त्यांचा अनुभव विचारात घेऊन नियमांचा मसुदा केला पाहिजे, असे मत माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने केंद्रीय मोटार वाहन अधिनियम संशोधन 2021 या मोटार ड्रायव्हिंग स्कूल असे या संदर्भात येणाऱ्या कायद्याच्या संदर्भात परिषदेचे आयोजन महाराष्ट्राचे मोटर ड्रायविंग स्कूल यांच्यावतीने शनिवारी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, चालक मालक मोटार वाहन संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे आम्ही पालन करून आम्ही सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल कुशल वाहनचालक निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहू, आम्ही नाही करणार हॉर्नचा वापर अशा प्रकारची शप्पथ महेश झगडे यांनी उपस्थितांना दिली
महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने या परिषदेमध्ये प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्स मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनिवार्य करा. दरवर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असते. ते वाहन चालक कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण न घेता डायरेक रस्त्यावर वाहने अंतात प्रत्येक वाहन चालक सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग कडकडून आल्यास त्याला नियमाचे व वाहन चालवण्याची माहिती होऊन प्राणघातक अपघात कमी होण्यासाठी मदत होईल प्रशिक्षण वाहन चालक वाहतुकीच्या नियमांची व प्रशिक्षण घेऊन रस्त्यावर येतील म्हणून प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्स सरकार मान्य मोटर स्कूल करणे अनिवार्य करा असा ठराव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर जाधव यांनी केले. निलेश गांगुर्डे यांनी आभार मानले.