गणपती विर्सजन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; 'हे' आहेत विर्सजन घाट

By राजू हिंगे | Published: September 27, 2023 02:27 PM2023-09-27T14:27:46+5:302023-09-27T14:30:13+5:30

लाडक्या बाप्पाला उत्साही आणि अनंदमय वातावरणात निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांसाठी मंडळांसह महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे...

Municipality ready for Ganapati Virsajan procession; 'These' are the Virsjan Ghats | गणपती विर्सजन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; 'हे' आहेत विर्सजन घाट

गणपती विर्सजन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; 'हे' आहेत विर्सजन घाट

googlenewsNext

पुणे : गेली दहा दिवसापासून शहर व परिसरात मोठ्या उत्साहाने साजर होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज (गुरुवार) भव्य अशा मिरवणुकीने होणार आहे. लाडक्या बाप्पाला उत्साही आणि अनंदमय वातावरणात निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांसाठी मंडळांसह महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक देशातील गणेश भक्तांसाठी आकर्षण असते. या विसर्जन मिरवणूकीसाठी शहराबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरातील विसर्जन घाटांवर तीन शिफ्ट मध्ये कर्मचारी तैनात केले असून विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, कंटेनर, मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन हाौदांची दुरुस्ती करून त्यांत स्वच्छ पाणी भरण्यात आले आहे. याशिवाय शहरात विसर्जन मार्गावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे आहेत विर्सजन घाट-

संगम घाट, नेने/आपटे घाट, वृध्देश्वर घाट / सिध्देश्वर घाट, ओंकारेश्वर, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे, बापूघाट (नारायण पेठ), खंडोजी बाब चौक, विठ्ठल मंदिर (अलका चौक), गरवारे कॉलेजची मागील बाजू, ठोसरपागा घाट, दत्तवाडी घाट, राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर, औंधगाव घाट, चिमा उद्यान येरवडा, बंडगार्डन घाट, वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदीकिनार , पांचाळेश्वर या घाटावर विर्सजनाची तयारी करण्यात आली आहे.

अग्निशमन दल सुरक्षेसाठी कटीबद्ध-

अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा. गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे यांपासून दूर उभे करुन त्यांचेजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे. मुख्य विसर्जन मिरवणूकीत काही कारणास्तव आगीचा प्रादुर्भाव झाल्यास या आग तातडीने विझविण्याचे उद्देशाने कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्वीशर्स व हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

२५६ ठिकाणी निर्माल्य संकलन व्यवस्था

शहरातील २५६ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यात ५३ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले जाणार आहेत. तर विविध ठिकाणी १५३ ठिकाणी लोखंडी कंटेनरची व्यवस्था केली आहे. कंटेनर भरल्यानंतर ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

घाटांवर अग्निशमन दलाचे १२८ जीवरक्षक-

गणेश विसर्जनाच्यावेळी नदी घाटांवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागानेही सर्वतोपरी तयारी केली आहे. मुठा नदीकाठच्या मुठा नदीकाठच्या एकूण १४ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने १७ फायरमन सेवक व १११ जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.. तसेच प्रत्येक दोन घाटांवर १ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यााकडे लाईफ जॉकेट, लाईफ बॉय असे साहित्य असणार आहे. नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने गरवारे, संभाजी पूल, लकडी पूल यांना नेकलेस जाळी लावण्यात आली आहे. याशिवाय जागोजागी नदीपात्रात आडवा दोरही बांधण्यात आला आहे. त्यामुळे नदीत बुडणाऱ्याला मदत मिळू शकणार आहे.

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष-

विसर्जनासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापनाही केली आहे. या विभागाचे 020-25501269, 25506800, 25506801, 25500802 हे दूरघ्वनी क्रमांक असून, त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जलप्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विर्सजन करा-

शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन होईल, या दृष्टीने पालिकेने तयार केलेल्या हौदामध्ये तसेच लोखंडी टाक्यांमध्येच मूर्तीचे विसर्जन करावे. अधिकाधिक नागरिकांनी अशा पद्धतीनेच ‘श्रीं’चे विसर्जन करून यंदाच्या वर्षी नवीन आदर्श घालून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांचीही जय्यत तयारी-

पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषदोपचार, ग्रुप स्विपींग, कंटेनगर, निर्माल्या कलश, किटकनाशक फवारणी, विद्युत यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी, मलवाहिनी यांची गळती झाल्यानंतर ती त्वरीत दुरूस्त करण्यासाठी पथक, फिरती स्वच्छतागृहे, सूटना फलक आदी तयारी केली आहे.

१५ क्षेत्रिय कार्यालय

४२ हौद
२६५ ठिकाणी ५६८ लोंखडी टाक्या

२५२ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र
२५६ निर्माल्य कलश

१५० फिरते विर्सजन हौद
४०० मोबाईल टॉयलेट

Web Title: Municipality ready for Ganapati Virsajan procession; 'These' are the Virsjan Ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.