दुमजली उड्डाणपूल उभारणीचा निम्म्या खर्चाचा प्रस्ताव पालिकेने नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:39+5:302021-07-14T04:12:39+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपूल उभारणीचा निम्मा खर्च महापालिकेने करावा, हा पुणे महानगर प्रदेश ...
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपूल उभारणीचा निम्मा खर्च महापालिकेने करावा, हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा प्रस्ताव महापालिकेने नाकारला आहे. मात्र या उड्डाणपुलास ग्रेड सेपरेटर उभारणीचा खर्च उचलण्यास मान्यता दिली आहे.
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठ चौकात एकाच खांबावर मेट्रो व त्याखाली दुहेरी वाहतुकीकरीता दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी ४२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी ५० टक्के खर्च पुणे महापालिकेने करावा, असा प्रस्ताव पीएमआरडीएने दिला होता. तो नाकारण्यात आला असून, महापालिका केवळ १५८ कोटी रुपयांचा खर्च वाहतुकीचा विचार करून टप्प्याटप्प्याने करणार आहे.
-------
महापालिका यासाठी करणार खर्च
* शिवाजीनगरकडून औंधकडे जाण्यासाठी अंडरपास करणे : ६८ कोटी रुपये
* सेनापती बापट रस्त्यावरून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलास २ लेन रॅम्पद्वारे कनेक्शन करणे : २५ कोटी रुपये
* हरेकृष्ण मंदिर येथे २ २ लेन ग्रेड सेपरेटर करणे : १५ कोटी रुपये
* सिमला ऑफिस चौक येथे दोन लेन ग्रेड सेपरेटर करणे : १० कोटी रुपये
* अभिमानश्री चौकामध्ये ग्रेड सेपरेटर करणे : ४० कोटी रुपये.
--------
फोटो मेल केला आहे.