पालिका रुग्णालयातही होणार संशोधन

By admin | Published: May 22, 2017 05:04 AM2017-05-22T05:04:27+5:302017-05-22T05:04:27+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांमधील विद्यार्थ्यांना निरीक्षण, संशोधनासाठी उपलब्ध होणार आहेत

The municipality will also be conducting research | पालिका रुग्णालयातही होणार संशोधन

पालिका रुग्णालयातही होणार संशोधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांमधील विद्यार्थ्यांना निरीक्षण, संशोधनासाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा पाच हजार रुपये शुल्क संबंधित विद्यार्थी किंवा त्या महाविद्यालय, संस्थांना अदा करावे लागणार आहे.
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात वैद्यकीय सरावासाठी येताना आवश्यक ते शुल्क भरून येत असतात. परंतु, कोणत्याही रुग्णालयात निरीक्षण, संशोधनासाठी किती शुल्क आकारण्यात यावे, याचा उल्लेख नाही. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता विनामोबदला परवानगी दिली जात असे. त्यामध्ये विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच अनेक खासगी महाविद्यालये आणि संस्थांचे विद्यार्थीदेखील असत.
मात्र, यापुढे सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांमधील विद्यार्थ्यांना पालिका रुग्णालये निरीक्षण, संशोधनासाठी उपलब्ध करून देताना त्यांच्याकडून शुल्क घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Web Title: The municipality will also be conducting research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.