दोघांचा खून पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:36+5:302020-12-27T04:09:36+5:30
एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अनिल रतन ...
एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४
दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अनिल रतन कचरावत (वय-४७, रा. कोंढवा गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे पोलिस
कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्वनाथ नामदेव शिंदे (वय, ५४) यांनी फिर्याद दिली आहे.
सलीम मेहबूब शेख (वय ४५, रा. लेकटाउन, कात्रज) आणि तौफिक शेख (वय-36, रा.
काकडे वस्ती, बिबवेवाडी) अशी खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खून झालेल्या व्यक्ती आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सलिम शेख आणि
आरोपी हे कोंढवा गंगाधाम रस्त्यावरील जय मल्हार हॉटेल मध्ये कामाला होते.
तर तौफिक शेख हा नेहमी चहा पिण्यासाठी हॉटेल मध्ये येत असत. शुक्रवारी
सकाळी सव्वादहाच्या सुमारास सलीम श्रीजी लॉन्ससमोर गल्लीत बसला होता.
त्यावेळी तेथे आलेल्या अनिलने दारुवरुन त्याच्या सोबत वाद घातला. सलीम
रोज फुकटची दारू पीत असल्याच्या आरोप करुन, इमारत बांधण्यासाठी वापरल्या
जाणार्या लोखंडी पट्टीने अनिलने सलीमच्या डोक्यात वार केले. यात सलीमचा
मृत्यू झाला.
या दरम्यान सलीमला जेवणाचा डबा घेउन आलेल्या तौफिकलाही आरोपी अनिलने पाहिले. त्याने तौफिकचा पाठलाग करुन त्याच्या डोक्यात पट्टीने वार केला. गंभीर जखमी तौफिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान
रात्री त्याचा मृत्यू झाला.
पुढील तपासासाठी आरोपीची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ती मंजूर केली.