फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला १० महिन्यांनी हवेलीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:37 PM2018-02-10T18:37:26+5:302018-02-10T18:39:57+5:30

नांदोशी गावाजवळ गेल्या वर्षी फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला तब्बल दहा महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अक्षय आनंदा चौधरी (रा. नांदोशी हवेली) असे आरोपीचे नाव आहे. 

murder case absconded accused arrested in Haveli, Pune after 10 months | फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला १० महिन्यांनी हवेलीत अटक

फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला १० महिन्यांनी हवेलीत अटक

googlenewsNext
ठळक मुद्देबाळासाहेब शंकर घुले यांचा २७ एप्रिल २०१७ रोजी झाला होता खूनयातील ८ आरोपींना या पूर्वी करण्यात आली आहे अटक

पुणे : नांदोशी गावाजवळ गेल्या वर्षी फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला तब्बल दहा महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अक्षय आनंदा चौधरी (रा. नांदोशी हवेली) असे आरोपीचे नाव आहे. 
किरकटवाडी रस्त्यावरील काच कारखान्याजवळ बाळासाहेब शंकर घुले यांचा २७ एप्रिल २०१७ रोजी खून झाला होता. यातील ८ आरोपींना या पूर्वी अटक करण्यात आली आहे. चौधरी फरार होता. गणेश पेठेतील शिवरामदादा तालीम येथे एका व्यक्तीला तो भेटायला येणार असल्याची माहिती फरासखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल शंकर संपते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौधरीला पकडले. 
घटनेच्या दिवशी आरोपी तानाजी कांबळे याने डंपरच्या सहाय्याने मयत घुले यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. डंपरने त्यांच्या गाडीस ठोकर मारली. त्यामुळे घुले यांची गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. त्यावेळी दुसऱ्या चारचाकी गाडीतून मिलींद किवळे, राहुल किवळे, अक्षय चौधरी, दत्ता पोकळे व पाच अनोळखी व्यक्ती आल्या. मिलिंद व राहुल किवळे यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वरमधून घुले यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यातून घुले आणि त्यांचे साथीदार बचावले. त्यानंतर घुले यांना गाडीतून बाहेर काढत अक्षय चौधरी, दत्ता पोकळे आणि इतर आरोपींनी कोयत्याने वार करुन ठार मारले. या प्रकरणी चौधरी हा पोलिसांना चकवा देत होता. त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात बेकायदा पिस्तूल बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: murder case absconded accused arrested in Haveli, Pune after 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे