पुण्यात जावयाने केला सासऱ्याचा खून; घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:48 AM2022-04-21T11:48:38+5:302022-04-21T11:49:02+5:30

कौटुंबिक वादातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

murder father in law in Pune After the incident the accused himself entered the police station with a knife in his hand | पुण्यात जावयाने केला सासऱ्याचा खून; घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये

पुण्यात जावयाने केला सासऱ्याचा खून; घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये

Next

पुणे : पुण्यातील खडकी बाजार परिसरात काल एक धक्कदायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून जावयाने साऱ्याचा चाकूने वार करत खून केला आहे.  रमेश उत्तरकर असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक कुडले हा त्यांचा जावई असून या घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कुडले रमेश उत्तरकर यांचा जावई आहे.  2019 पासून अशोक आणि त्याच्या पत्नीत वाद होते. त्यामुळे ते दोघे वेगळे राहायचा अस. त्याची पत्नीही गेल्या तीन वर्षापासून वडिलांकडे राहायला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

दरम्यान या दोन कुटुंबातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. अशोक कुडले हा आपल्या पत्नीला नांदायला परत पाठवा अशी मागणी सतत आपल्या सासर्‍याकडे करत होता. तर उत्तरकर हे घटस्पोट देण्याबाबत ठाम होते. याप्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. या दरम्यानच या दोघांमध्ये काल दुपारी वाद झाला. हाच वादाचा राग डोक्यात ठेवून संध्याकाळी अशोक हा उत्तरकर यांच्या दुकानात गेला. उत्तरकर हे सायंकाळी दुकानात बसले असताना अशोकने त्यांच्यावर  चाकूने जोरदार वार केले. त्यानंतर उत्तरकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली देखील दिली.

Web Title: murder father in law in Pune After the incident the accused himself entered the police station with a knife in his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.