डहाणुकर कॉलनीत रखवालदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:08+5:302020-12-28T04:07:08+5:30

पुणे : कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीतील अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात रखवालदार असलेल्या एकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला ...

Murder of a guard in Dahanukar Colony | डहाणुकर कॉलनीत रखवालदाराचा खून

डहाणुकर कॉलनीत रखवालदाराचा खून

Next

पुणे : कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीतील अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात रखवालदार असलेल्या एकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय ४७, रा. डहाणुकर कॉलनी, पुष्पलता बिल्डिंगजवळ, कोथरुड) असे या रखवालदाराचे नाव आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

तावरे हे त्यांची आई व दोन मुले अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात रहायला आहेत. तावरे मद्यपी असल्याने त्याची पत्नी त्यांना सोडून गेली आहे. तावरे यांचा भाऊ डहाणुकर कॉलनीतील एका इमारतीत रखवालदार आहे. तावरे अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात रखवालदार म्हणून काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी तो बंगल्याच्या आवारात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तावरे यांच्या भावाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात तावरे यांचा गळा दाबल्याने तसेच त्यांना मारहाण केल्याने दोन्ही हात दंडामध्ये मोडून व शरीरावर इतरत्र कशाचे तरी सहाय्याने मारहाण करुन जखमा केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तावरे यांच्या खुनामागील कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a guard in Dahanukar Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.