अनैतिक संबंधात अडथळा येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून; तब्बल दीड महिन्यानी गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:39 PM2021-08-17T12:39:51+5:302021-08-17T12:48:49+5:30

प्रियकराच्या मदतीने काढला होता पतीचा काटा

Murder of a husband who interferes with an immoral relationship; The crime was exposed after a month and a half | अनैतिक संबंधात अडथळा येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून; तब्बल दीड महिन्यानी गुन्हा उघडकीस

अनैतिक संबंधात अडथळा येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून; तब्बल दीड महिन्यानी गुन्हा उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देखुनाच्या घटनेनंतर दीड महिना उलटुनही याबाबत पोलिसांना धागेदोरे नव्हते मिळत अखेर पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

राजगुरुनगर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार खेड तालुक्यातील औंढे येथे उघडकीस आला आहे. खुनाचा हा गुन्हा तब्बल दीड महिन्यांनंतर उघडकीस आणण्यात खेडपोलिसांना यश आले आहे. सोमनाथ बबन सुतार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रामा उर्फ रामदास नथु शिंदे, सोनल सोमनाथ सुतार हे दोघे (रा. औंढे ता.खेड ), अक्षय सुरेश शिंदे, समीर कोंडाजी मेदगे (रा.औंढे ता.खेड) यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढे येथील तरुणाचा मृतदेह २६ जूनला चासकमान धरणातंर्गत असलेल्या वाळद गावच्या पुलानजीक पाण्यात आढळून आला होता. खेड पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. हा तरुण हा स्वतःच्या वाहनातून प्रवाशी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत होता. या प्रकरणाबाबत गावात मात्र अनैतिक संबंध व त्यावरुन खून झाल्याचा सशंय व्यक्त केला जात होता.

गावातील एक दुकानदार आणि अवैध दारु धंदा विक्रेता असणारा व्यक्ती याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची दबल्या आवाजात चर्चा होती. खुनाच्या घटनेनंतर दीड महिना उलटुनही याबाबत पोलिसांना धागेदोरे मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी आरोपीना जेरबंद केले आहे.

पत्नी व प्रियकर यांच्या साथीदारांनी सोमनाथ बबन सुतार (वय ३४ ) रा. औढे ता खेड ) याला दारू पाजून दोरीने गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी सुतार यांचा मृतदेह वाळद येथील चासकमान धरणाचे बॅक वॉटरवर असलेल्या पुलावरून पाण्यात टाकून दिला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. पोलीस हवालदार भगवान लक्ष्मण गिजरे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल लाड करत आहे.

Web Title: Murder of a husband who interferes with an immoral relationship; The crime was exposed after a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.