सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:07 AM2024-05-30T00:07:58+5:302024-05-30T00:08:21+5:30

माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या.

Murder of a criminal on record in Sangvi  | सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 

सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 

प्रकाश गायकर, पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीमध्ये पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री पावणेदहा वाजता घडली. 

दीपक कदम (वय अंदाजे 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. दीपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोळ्या झाडून आरोपी पळून गेला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. दीपक हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
 

Web Title: Murder of a criminal on record in Sangvi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.