पुण्यात सैराट! शस्त्राने सपासप वार करून मुलीच्या प्रियकराचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:50 PM2022-03-19T13:50:23+5:302022-03-19T14:05:21+5:30
पुण्यातील वारजे परिसरातील घटना...
पुणे : मुलीशी असलेले मैत्रीचे संबंध तोडून टाक, तिला त्रास देऊ नको असे सांगूनही न ऐकणाऱ्या तरुणाचा तिच्या नातेवाइकाने खून केला. वारजे परिरसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली.
प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय २२, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय विजय पायगुडे (वय १९), विजय किसन पायगुडे (वय ५०), एक महिला (सर्व रा. साईश्रद्धा रेसिडन्सी, शिवणे), सागर गोविंद
राठोड (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाचा आतेभाऊ कांबळे याचे पायगुडे यांच्या नात्यातील एका मुलीशी मैत्रीसंबंध होते. मुलीच्या नातेवाइकांचा याला विरोध होता. मुलीला त्रास देऊ नको, असे त्याला वारंवार बजावून सांगत होते. दोन दिवसांपूर्वी रात्री कांबळे शिवणे परिसरात गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. सिमेंटचा गट्टू तसेच गजाने त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पार्वे तपास करत आहेत.