गुप्तांगावर वार करून मजुराचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 02:29 PM2022-11-19T14:29:27+5:302022-11-19T14:30:06+5:30
बेदम मारहाण आणि गुप्तांगावर वार करून खून...
पुणे : घरा शेजारी राहणाऱ्या मजुरास बेदम मारहाण आणि गुप्तांगावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मजूर आराेपीने कुटुंबासह पाेबारा केला. हडपसर पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत. अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. शेवाळवाडी बसथांब्याशेजारी, मांजरी, मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पिताराम केवट (वय २३, रा. शेवाळवाडी बसथांबाशेजारी, मांजरी, मूळ मध्य प्रदेश) याच्या विरुद्ध हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी पिताराम आणि अरुण सूर्यवंशी हे शेजारी-शेजारी राहत आणि एकाच नर्सरीत कामाला होते. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ते दोघे दारू पिण्यासाठी गेले. त्यानंतर पिताराम हा एकटाच घरी परतला. त्यामुळे मृत अरुण यांच्या कुटुंबीयांनी पिताराम याच्याकडे चौकशी केली असता त्याने मला काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच रात्री पिताराम हा घरातील सर्व सामान व पत्नीला घेऊन पसार झाला. सूर्यवंशी कुटुंबीयांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी हडपसर पाेलिसांत धाव घेत तक्रार दिली.