Pune Crime: पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात युवकाचा खून; मृतदेह फेकला दरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:50 IST2022-02-22T18:49:54+5:302022-02-22T18:50:10+5:30
पुणे - नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी यांचा दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास खुन झाला

Pune Crime: पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात युवकाचा खून; मृतदेह फेकला दरीत
राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. स्वप्नील सखाराम चौधरी ( वय २५ रा. आंबेओहळ ,खरपुडी बुद्रुक ,ता खेड ) असे युवकाचे नांव आहे. अद्याप खून कोणी केला कशासाठी केला याबाबत उलगडा झाला नसून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
पुणे -नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी यांचा दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास खुन झाला. चौधरी याला दारू पाजून यांचा खुन करून महामार्ग लगत असणाऱ्या खोल दरीत टाकून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश गुरुव, महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल लाड यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. तरुणाच्या डोक्यावर मानेवर तीक्ष्ण व धारदार हत्याराने वार करून खुन करण्यात आला आहे. या खुन झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
''खून झालेला युवक खरपुडी (ता खेड ) येथील असून हया युवकाला खेड घाटात कोणी आणले येथे का आले होते. कशासाठी आले होते याचा खून कुणी केला. याबाबत तपास चालू आहे तसेच असून लवकरच या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात येईल असे सुर्दशन पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी खेड ) यांनी सांगितले.''