Pune Crime: बाणेरमधील ‘त्या’ मजुराचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून, खुनाचे कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 14:37 IST2024-06-12T14:37:06+5:302024-06-12T14:37:35+5:30
पुणे : बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून, तोंडाला रूमाल बांधून त्याचा खून करण्यात आला होता. मात्र, या ...

Pune Crime: बाणेरमधील ‘त्या’ मजुराचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून, खुनाचे कारण समोर
पुणे :बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून, तोंडाला रूमाल बांधून त्याचा खून करण्यात आला होता. मात्र, या खुनामागचे नक्की कारण समजू शकले नव्हते; मात्र पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावला.
कृष्णा भीमराव सुरोशे (वय ४०, रा. बालेवाडी गावठाण, मूळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बाणेर भागातील धनकुडे वस्ती परिसरात दि. ७ जूनला ही घटना घडली हाेती. चादर याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय कृष्णाला हाेता. त्यामुळे दारूच्या नशेत माेकळ्या मैदानात झाेपल्याचे दिसून आले. त्यावेळी चादर यांच्या डोक्यात दगड घालून कृष्णा अंबरनाथला पसार झाला.
तांत्रिक तपासात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत कृष्णाने चादर याच्या खुनाची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदूम, हरीश मोरे, सारस साळवी, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेशसिंह कुंवर, एकनाथ जोशी यांनी ही कारवाई केली.