अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:14 AM2023-10-02T10:14:10+5:302023-10-02T10:14:21+5:30

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासांत छडा लावून ५ जणांना ताब्यात घेतले

Murder of Vijay Dhume through immoral relationship Five people including a woman, were detained | अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात

अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात

googlenewsNext

धायरी: हॉटेल व्यावसायिक असलेल्या विजय वसंत ढुमे याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड झाले असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासांत छडा लावून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

सुजाता समीर ढमाल (वय ३३, रा. किरकिटवाडी, नांदोशी रस्ता, पुणे), तिचा नवीन प्रियकर संदीप तुपे (वय २७, रा. कांदलगाव, ता. इंदापूर), सागर तुपसुंदर ( वय १९, रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (वय १८, रा. उंड्री-पिसोळी) आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि.२९ सप्टेंबर) सायंकाळी पावणेसात वाजता दावत हॉटेलच्या मागील क्वॉलिटी इन लॉजच्या पार्किंगमध्ये चिंचवड येथे राहणाऱ्या विजय ढुमे याच्या डोक्यात लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील जवळपास ७० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आणि मयत विजय ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता ढमाल हिच्या सखाेल तपासाअंती सुजाता ढमाल, तिचा नवीन प्रियकर संदिप तुपे आणि त्याच्या साथीदारांसह मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून अटक आरोपींच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील आरोपी संदिप दशरथ तुपे याच्याविरुद्ध टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार सतीश नागूल, सुनील चिखले, पोलिस हवालदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे.

मानसिक अन् शारीरिक छळ करायचा म्हणून केला खून...

या प्रकरणातील आरोपी महिला सुजाता ढमाल ही सिंहगड परिसरात राहावयास असून, तिचे विजय ढुमे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर तिचे संदिप तुपे याच्याबरोबरही प्रेमसंबंध तयार झाले. त्यावेळी तिने विजय ढुमे हा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे संदीप तुपे याला सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी इतर साथीदारांसह त्याचा काटा काढण्याचे ठरविले. घटनेच्या दिवशी दुपारी क्वॉलिटी इन लॉजमध्ये विजय ढुमे व सुजाता ढमाल हे दोघे भेटले. त्यानंतर सुजाता ढमाल ही तिथून निघून गेली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजय ढुमे हा लॉजमधून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचा खून केला.

Web Title: Murder of Vijay Dhume through immoral relationship Five people including a woman, were detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.