दुचाकीवर दगड मारल्याच्या वादात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:25+5:302021-01-20T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवर दगड मारल्याच्या कारणावरुन एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. ...

Murder of one in a dispute over throwing stones at a bike | दुचाकीवर दगड मारल्याच्या वादात एकाचा खून

दुचाकीवर दगड मारल्याच्या वादात एकाचा खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दुचाकीवर दगड मारल्याच्या कारणावरुन एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अवघ्या ५ तासात खुन करणाऱ्यास अटक केली आहे.

अतिश सुरेश वायदंडे (वय २३, रा. शिवनेरी नगर कोंडवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्ञानोबा गंगाधर धनगे (वय ४५, रा. शिवनेरीनगर कोंढवा. मुळ गंगाखेड जि. परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा रमाकांत हाके (वय२६, रा. महादेवनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगे व वायदंडे हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. धनगे हा सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास मद्यप्राशन करून पाण्याच्या टाकीच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात गोंधळ घालत होता. त्याचवेळी वायदंडे हा तेथून दुचाकीवरून जात होता. त्या दोघात बाचाबाची झाली. धनगे याने वायदंडेला दगड फेकून मारला. तो दगड वायदंडेच्या दुचाकीच्या टाकीला लागला. त्यातूनच आपली पहिली गाडी असल्याने दगड लागल्याचा पाहून वायदंडेला धनगेचा राग आला. चिडलेल्या वायदंडेने धनगेला धक्का मारून डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वायदंडेने तेथून पळ काढला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कोंढवा पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.

गुन्हे शाखा युनिट ५ चे सहायक पोलिस निरीक्षक लोणारे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की धनगे याचा खून अतिश वायदंडे याने केला आहे. त्यानुसार सापळा रचून वायदंडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. अवघ्या पाच तासात पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ च्या पथकाने केली.

Web Title: Murder of one in a dispute over throwing stones at a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.