प्रेयसीचा गळा दाबून खून करून मृतदेहाचे केले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:26+5:302021-08-25T04:16:26+5:30

पिरंगुट, मुठा घाटात तुकडे टाकणाऱ्या प्रियकराला अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रेयसीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून ते ...

Murder by strangling the beloved | प्रेयसीचा गळा दाबून खून करून मृतदेहाचे केले तुकडे

प्रेयसीचा गळा दाबून खून करून मृतदेहाचे केले तुकडे

Next

पिरंगुट, मुठा घाटात तुकडे टाकणाऱ्या प्रियकराला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेयसीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून देणाऱ्या प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तब्बल १२ दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे.

हनुमंत अशोक शिंदे (वय ४०, रा. बुधवार पेठ) याला अटक केली आहे. तर रोजिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी (वय ३०, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी, हनुमंत शिंदे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास नारायण पेठ परिसरात घडली आहे. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हनुमंत शिंदे हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याचे बुधवार पेठेत दुकान आहे. तर रोजिना ही बुधवार पेठेत देहविक्री करत होती. त्यातून दोघांची ओळख झाली. त्यांचे प्रेम जुळल्यानंतर हनुमंत याने रोजिना हिला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. हनुमंतचा अगोदर विवाह झाला होता. त्यामुळे तो अधूनमधून तिच्याकडे जात होता. रोजिना हनुमंतला त्याच्यासोबत राहण्यास सांगत होती. ती त्याला घरी जाऊ देत नव्हती. तसेच तिला दारूचे व्यसनदेखील होते. दररोज ती देहविक्रीसाठी बुधवार पेठेत जात होती. सकाळी सोडण्याचे आणि संध्याकाळी घेऊन जाण्याचे काम हनुमंत याला करावे लागत होते. त्यातूनच दोघांत वाद होत होते. १२ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास हनुमंत रोजिनाच्या फ्लॅटवर गेला होता. त्या वेळी तिने त्याच्यासोबत तू दिवसभर घरी आला नाही म्हणून वाद करत शिवीगाळ केली. त्या वेळी रागाच्या भरात हनुमंत याने रोजिनाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फ्लॅट बंद करून अक्कलकोट येथे पळून गेला होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पुण्यात आला. या कालावधीत तब्बल दोन दिवस रोजिना हिचा मृतदेह घरातच पडून होता. त्यानंतर हनुमंत याने १४ ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा छोटा टेम्पो सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने मागून घेतला. त्यानंतर कोयत्याने रोजिना हिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भूगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर तो आपण कोणताच गुन्हा केला नसल्याच्या आविर्भावात फिरत होता.

-------------------

दोन पिशव्या कुजलेल्या अवस्थेत

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने आरोपी हनुमंत शिंदे याला सोबत घेऊन भूगाव ते लवासा घाट परिसरातील विविध ठिकाणी टाकून दिलेले मृतदेहाचे तुकडे जमा केले. दोन पिशव्या कुजलेल्या अवस्थेत पोलिसांच्या हाती लागल्या असून, पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पांडुरंग वाजंळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Murder by strangling the beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.