प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:46 PM2021-08-24T20:46:54+5:302021-08-24T20:49:22+5:30

पिरंगुट, मुठा घाटात तुकडे टाकणाऱ्या प्रियकराला अटक

Murder by strangling a lover; Pieces of corpses, shocking incidents in Pune | प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल दुरुस्तीचे काम करतो त्याचे बुधवार पेठेत दुकानमहिला बुधवार पेठेत देहविक्री करणारी

पुणे : प्रेयसीचा खुन करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून देणार्या प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. तब्बल १२ दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे.

हनुमंत अशोक शिंदे ( वय ४० रा. बुधवार पेठ) याला अटक केली आहे. तर रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय ३०, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी, हनुमंत शिंदे याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास नारायण पेठ परिसरात घडली आहे. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हनुमंत शिंदे हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो त्याचे बुधवार पेठेत दुकान आहे. तर रोजिना ही बुधवार पेठेत देहविक्री करत होती. त्यातून दोघांची ओळख झाली. त्यांचे प्रेम जुळल्यानंतर हनुमंत याने रोजिना हिला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. हनुमंत हा अगोदर विवाह झाला होता. त्यामुळे तो अधुनमधून तिच्याकडे जात होता. रोजिना हनुमंतला त्याच्यासोबत राहण्यास सांगत होती. ती त्याला घरी जाऊ देत नव्हती. तसेच तिला दारुचे व्यसन देखील होते. दररोज ती देहविक्रीसाठी बुधवार पेठेत जात होती.

सकाळी सोडण्याचे आणि संध्याकाळी घेऊन जाण्याचे काम हनुमंत याला करावे लागत होते. त्यातूनच दोघांत वाद होत होते. १२ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास हनुमंत रोजिनाच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी तिने त्याच्यासोबत तू दिवसभर घरी आला नाही म्हणून वाद करत शिवीगाळ केली. त्यावेळी रागाच्या भरात हनुमंत याने रोजिना गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फ्लॅट बंद करून अक्कलकोट येथे पळून गेला होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पुण्यात आला. या कालावधीत तब्बल दोन दिवस रोजिना हिचा मृतदेह घरातच पडून होता. त्यानंतर हनुमंत याने १४ ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा छोटा टेम्पो सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने मागून घेतला. त्यानंतर कोयत्याने रोजिना हिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर तो आपण कोणताच गुन्हा केला नसल्याच्या अविर्भावात फिरत होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने आरोपी हनुमंत शिंदे याला सोबत घेऊन भुगाव ते लवासा घाट परिसरातील विविध ठिकाणी टाकून दिलेले मृतदेहाचे तुकडे जमा केले. दोन पिशव्या कुजलेल्या अवस्थेत पोलिसांच्या हाती लागल्या असून, पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पांडुरंग वाजंळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे.

महिला बेपत्ता असल्याच्या खबरीवरुन आला खुनाचा प्रकार उघडकीस

बुधवार पेठेतील कुंटणखाना परिसरात पोलिसांचे खबरी असतात. तेथे कोण येते, कोण जाते, याची बितंमबातमी पोलीस ठेवत असतात. अशातूनच येथे देहविक्री करणारी एक महिला गेल्या १० ते १२ दिवसांपासून बेपत्ता असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली. त्यावरुन शोध घेत असताना तिेच हनुमंत शिंदे याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरुन पोलिसांना त्याच्यावरील संशय आणखीनच वाढला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आपण तिचा खुन केल्याचे त्याने सांगितले. मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्याने निदर्यपणे केलेले तुकडे पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.
 

Web Title: Murder by strangling a lover; Pieces of corpses, shocking incidents in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.