घरगुती त्रासातून सासूचा गळा दाबून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:24+5:302021-05-03T04:06:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीला गावी सोडून सासूबरोबर एकत्र राहणाऱ्या जावयाने दररोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून रागाच्या भरात हाताने ...

Murder by strangling mother-in-law out of domestic trouble | घरगुती त्रासातून सासूचा गळा दाबून केला खून

घरगुती त्रासातून सासूचा गळा दाबून केला खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीला गावी सोडून सासूबरोबर एकत्र राहणाऱ्या जावयाने दररोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून रागाच्या भरात हाताने मारहाण करुन ओढणीने सासूचा गळा आवळून खून केला. बिबवेवाडीतील शेळकेवस्ती येथे शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी असिफ दस्तगीर आत्तार (वय २६, रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. अनारकली महमद तेरणे (वय ४५) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे.

याप्रकरणी मौलाली मंजलापुरे (वय ३१, रा़ इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. असिफ हा मंजलापुरे यांच्या पत्नीच्या मामाचा मुलगा आहे. तो मूळचा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील आहे. तो ८-९ महिन्यांपूर्वी मंजलापुरे यांच्याकडे आला. त्याने आपले व पत्नीची भांडणे झाली असून मी तिला सोडून दिले आहे. अनारकली ही सासू असून मी तिला पळवून आणले असून ती माझी बायको आहे. तिची मुलगी सोनियाही आमच्याबरोबर आहे, असे त्याने मंजलापुरे यांना सांगितले. त्यांच्या ओळखीतून बिबवेवाडी येथील शेळकेवस्तीत त्याला भाड्याने खोली घेऊन दिली होती.

अनारकली ही नीट जेवण करीत नाही. सतत पैसे मागत असते. यावरुन त्यांच्या रोज भांडणे होत. ३० एप्रिल रोजी त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. तेव्हा त्याने तिला मारहाण केली व असिफ घराबाहेर निघून गेला. रात्रभर रस्त्यावर फिरला. १ मे रोजी सकाळी ९ वाजता तो घरी परतला. तेव्हा त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात ओढणीने तिचा गळा आवळला. ती निपचित पडली. तेव्हा घाबरुन असिफ याने ही गोष्ट मंजलापुरे यांना सांगितली. त्यांनी तातडीने बिबवेवाडी पोलिसांना जाऊन ही हकिगत सांगितली. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता अनारकली हिचा मृत्यू झाला होता. पळून गेलेल्या असिफ आत्तार याचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder by strangling mother-in-law out of domestic trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.