खेड सेझ प्रकल्पात ठेकेदारी मिळविण्यासाठी माजी उपसरपंचाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 06:41 PM2019-12-13T18:41:23+5:302019-12-13T18:44:38+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पुणे (राजगुरुनगर ): खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव नवनाथ लक्ष्मण झोडगे ( वय ३६ ) झोडकवाडी,कनेरसर (ता खेड ) असे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नवनाथ झोडगे कनेरसर येथील सेझ प्रकल्पात ए.डी आर कंपनीचे कन्टक्शनचे काम करित होता. मयुर तांबे रा. वरुडे (ता. खेड ) हा मयत नवनाथ झोडगे यांच्याकडे कंपनीचे काम मागत होता. दोन दिवसापुर्वी या दोघांमध्ये कामावरुन बाचाबाची झाली होती. आज १ वाजण्याच्या सुमारास मयुर तांबे इतर ५ जण ए.डी.आर कंपनी सुरु असलेल्या बांधकाम कंपनीत आले.
तिथे मयत नवनाथ झोडगे व मयुर तांबे यांच्यामध्ये पुन्हा बाचाबाची होऊन कंपनीच्या आवारातच नवनाथ झोडगे यांच्यावर कोयत्याने डोक्यावर, पोटावर, हातावर सपासप वार केले. यामध्ये नवनाथ झोडगे जागीच मूत्यू झाला. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयत झोडगे यांला तात्काळ राजगुरूनगर येथील चांडोली ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. नातेवाईकांनी आरोपी हजर करा तरच मृतदेह ताब्यात घेणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुढील तपास खेड पोलिस स्टेशनचे पोलिस अरविंद चौधरी करित आहेत.