वनविभागाच्या हद्दीत महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:13+5:302021-05-27T04:12:13+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदाबाई केदार यांना पाच मुले आहेत. थोरांदळे गावच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या शेतात बाजरी ...

Murder of a woman within the boundaries of the Forest Department | वनविभागाच्या हद्दीत महिलेचा खून

वनविभागाच्या हद्दीत महिलेचा खून

Next

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदाबाई केदार यांना पाच मुले आहेत. थोरांदळे गावच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या शेतात बाजरी पिकाचे राखण करण्यासाठी हे सर्वजण आले आहेत. रांजणी गावच्या हद्दीत सध्या ते राहत होते. मंगळवारी सकाळी सात वाजता द्रोपदाबाई गिऱ्हे व त्यांचा मुलगा लक्ष्मण तसेच राजू केदार हे सर्वजण बाळू सुकाजी वाघ यांच्या शेतात बाजरी काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, रात्री घरी परतल्यानंतर द्रोपदाबाई गिऱ्हे यांना मांजरवाडी येथील नातेवाईकांचा भाजीपाला घेऊन जाण्यासाठी फोन आला. त्यानुसार त्या तो आणण्यासाठी गेल्या पण रात्री उशिरापर्यंत त्या परतल्या नाहीत. द्रोपदाबाई यांनी नातेवाईकांकडेच मुक्काम केला असले असे कुटुंबीयांना वाटल्याने त्यांनीही जास्त काही काळजी केली आहे. मात्र, दुस-या दिवशी सकाळी त्या न आल्याने त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. द्राेपदाबाई यांच्याकडे असणारा मोबाईलही बंद होता. दरम्यान १० वाजण्याच्या सुमारास थोरांदळे गावच्या हद्दीत वनखात्याच्या रानात एक ३० ते ३२ वर्षांची अर्धविवस्त्र महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली असता नंदाबाई केदार व कुटुंबीय या ठिकाणी गेले. त्यावेळेस मृतदेहाची ओळख पटवून हा मृतदेह द्रोपदाबाई गिऱ्हे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Murder of a woman within the boundaries of the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.