बहिणीची छेड काढल्याचा रागातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:39+5:302021-09-08T04:15:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : बहिणीची छेड काढल्याच्या रागात मनात धरून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्याने ...

Murder of a young man out of anger over his sister's molestation | बहिणीची छेड काढल्याचा रागातून युवकाचा खून

बहिणीची छेड काढल्याचा रागातून युवकाचा खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : बहिणीची छेड काढल्याच्या रागात मनात धरून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्याने तसेच लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आली. ही घटना चाकण येथे घडली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

रोहित प्रभू साहनी (वय १६, रा. झित्राईमळा, चाकण) असे हत्या करण्यात मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आरफत वाजीब सिकिलकर, करण पाबळे, हुजेब असिफ काकर, निहाल इनामदार, मन्सूर इनामदार, सोहेल इनामदार (सर्व रा. चाकण), युसुफ अर्षद काकर (वय २०, रा. चाकण) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत रोहित प्रभू साहनी याने आरोपी अराफत वाजीब सिकिलकर याच्या बहिणीची छेड काढली होती. याचा राग मनात धरून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हॉटेल सॅनकर कट्टा येथे बसलेल्या रोहितकडे सोमवारी (दि.६) दुपारच्या सुमारास अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले. मन्सूरने तिथून रोहितचे दुचाकीवरून अपहरण केले. चाकण मार्केट यार्डच्या समोर मोकळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात त्याला आणले. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून रोहितला मारहाण केली. अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला. यात यात रोहितचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूर काकर यास अटक केली. अराफत व त्याचे पाच साथीदार फरार आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Murder of a young man out of anger over his sister's molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.