तरुणाचा खून, पाच तासांत आरोपी जेरबंद

By Admin | Published: February 29, 2016 12:53 AM2016-02-29T00:53:52+5:302016-02-29T00:53:52+5:30

येथे जुन्या भांडणाच्या रागावरून पाच जणांनी रजत भारत निमजे (वय २२, वडगाव मावळ) या तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना येथील कानिफनाथ मंदिराजवळ शनिवारी रात्री

The murder of the youth, the accused is lodged in five hours | तरुणाचा खून, पाच तासांत आरोपी जेरबंद

तरुणाचा खून, पाच तासांत आरोपी जेरबंद

googlenewsNext

वडगाव मावळ : येथे जुन्या भांडणाच्या रागावरून पाच जणांनी रजत भारत निमजे (वय २२, वडगाव मावळ) या तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना येथील कानिफनाथ मंदिराजवळ शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. खुनानंतर फरार झालेल्या पाचही आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली.
या प्रकरणी दर्शन संजय वहिले (वय २०), संकेत दत्तात्रय वाबळे (१९), संकेत शिवाजी रौंधळ (१९), श्रेयश अशोक घारे (१९, चौघेही रा. वडगाव मावळ) व महेश काशिनाथ गायकवाड (वय २२, रा. वारंगवाडी, मावळ) अशी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत आणि आरोपी यांच्यात काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी रजत याला येथील श्री कानिफनाथ मंदिराजवळ बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. खुनानंतर आरोपी फरार झाले होते. खुनाची माहिती समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरारी संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, सतीश होडगर, विजय पाटील, राजेंद्र मिरगे, सुनील जावळे, दत्ता बनसुडे, विशाल साळुंखे आणि सागर चंद्रशेखर यांच्या पथकाने रात्री उशिरा शिरगाव (ता. मावळ) येथील साईबाबा मंदिराजवळ ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना वडगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)

Web Title: The murder of the youth, the accused is lodged in five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.