लोणीकंद येथे गोळीबार करून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:26+5:302021-02-10T04:12:26+5:30

लोणीकंद : पुणे- अहमदनगर रस्त्यावर लोणीकंद येथे मंगळवारी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना ...

Murder of a youth by firing at Lonikanda | लोणीकंद येथे गोळीबार करून तरूणाचा खून

लोणीकंद येथे गोळीबार करून तरूणाचा खून

Next

लोणीकंद : पुणे- अहमदनगर रस्त्यावर लोणीकंद येथे मंगळवारी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना वेशीच्या कमानीजवळ दुपारी १२ वाजता घडली. सचीन नानासाहेब शिंदे (वय २९) खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचीन शिंदे हा लोणीकंद येथे नगर रस्त्यालगर वेशीची कमान येथे एटीएम जवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यातील एकाने पिस्तूल काढत सचिन शिंदेवर पाठीमागून गोळी झाडली. ती थेट सचिनच्या डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.

सचिन शिंदे यास स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी रूगालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. सचीन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या गळ्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याने त्याला गोल्ह मॅन म्हणूनही परिसरात संबोधले जायचे. त्याचा खून हा पूर्व वैमन्यस्यातून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे.

घटनास्थळी जिल्हा अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी भेट देत पंचनामा केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला हल्लेखोरांबाबत तपासाच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे पुढील तपास करत आहेत.

चौकट

भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत

भरदिवसा हमरस्त्यालगत झालेल्या या घटनेने लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गोळीबार झालेल्या ठिकाणाजवळच लोणीकंद पोलिस ठाणे आहे. या परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

............. फोटो : लोणीकंद (ता. हवेली) येथे मंगळवारी दुपारी हल्लेखोरांनी २९ वर्षीय तरुणावर गोळ्या झाडल्या. घटनास्थळाची पाहणी करताना अप्पर जिल्हा अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व इतर पोलिस अधिकारी. ..... सोबत खून झालेल्या सचिन नानासाहेब शिंदे याचा फोटो

डोक्याजवळ गोळीबार करून सचिन नानासाहेब शिंदे (वय २९ वर्ष ) या तरुणाचा खून केला.

लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास लोणीकंद (ता. हवेली) येथे नगर रस्त्यालगत वेशीची कमानी जवळ एटीएम समोर सचिन शिंदे हा तरूण गप्पा मारत थांबलेला असताना दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरापैकी एकाने पिस्तुलातून पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली. थेट डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सचिन शिंदे यास स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

दरम्यान अप्पर जिल्हा अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी पाहणी करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अज्ञात हल्लेखोरांबाबत तपासाच्या सुचना दिल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गोळीबार झालेले घटनास्थळ लोणीकंद पोलिस ठाण्यापासून जवळच नगर हमरस्त्यालगत असून भरदिवसा येथे येवून गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्यामुळे लोणीकंद परिसरातील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सचिन शिंदे हा गुन्हेगार प्रवृतीचा होता गळ्यात सोन्याचे दांगिने गोप घालत असे त्याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, पोलीसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगात शोध मोहिम सुरू केली असून अधिक तपास लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत. भरदिवसा हमरस्त्यालगत झालेल्या या घटनेने लोणीकंद गाव परिसरात खळबळ उडाली आहे. ............. फोटो : लोणीकंद (ता. हवेली) येथे मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी २९ वर्षीय तरुणावर गोळ्या झाडल्या. घटनास्थळाची पाहणी करताना अप्पर जिल्हा अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व इतर पोलिस अधिकारी. ..... सोबत खून झालेल्या सचिन नानासाहेब शिंदे याचा फोटो

Web Title: Murder of a youth by firing at Lonikanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.