Pune: दारूला वीस रुपये न दिल्याने मित्राचा लाकडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:35 PM2021-12-16T18:35:33+5:302021-12-16T18:41:13+5:30

मारहाणीत थिटे याचा जागीच मूत्यू झाला तर दत्तात्रय टाकळकरही गंभीर जखमी झाला

murder of youth by friends twenty rupees drink alcohol kharpudi | Pune: दारूला वीस रुपये न दिल्याने मित्राचा लाकडाने ठेचून खून

Pune: दारूला वीस रुपये न दिल्याने मित्राचा लाकडाने ठेचून खून

googlenewsNext

राजगुरूनगर: दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून २७ वर्षीय युवकाचा लाकडाने गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथे घडली आहे. तसेच या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. रामदास सोपान थिटे  (वय २७ , रा. सडकवस्ती रेटवडी ता खेड ) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. ही घटना बुधवारी रात्री (दि १५ ) घडली.आरोपीला पोलिसांनी ८ तासात जेरबंद केले असून खुनाची कबुली दिली आहे. नितीन काळूराम काशिद (वय ४२ रा. खरपुडी ता खेड ) असे आरोपीचे नांव आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी रात्री दि. १५ खेड - कनेरसर मार्गावर खरपुडी गावच्या हद्दीत हॉटेल माथेरान गारवा येथे मयत रामदास सोपान थिटे व त्याचा मित्र दत्तात्रय रामदास टाकळकर हे दारू पिण्यास बसले होते. दरम्यान आरोपी नितीन काशिद हा दारूच्या नशेत पुन्हा दारू पिण्यास आला होता. मयत थिटे याच्याकडे दारू पिण्यास वीस रुपये मागत होता. पैसे न दिल्यामुळे आरोपी व मयत यांच्यामध्ये शिवीगाळ झाली. मयत थिटे व टाकळकर हे दारूच्या नशेत रस्त्यावर आले असताना काशिद याने लाकडी दांडक्याने थिटे यांच्या डोक्यात जोराचे प्रहार केले. या मारहाणीत थिटे याचा जागीच मूत्यू झाला. तसेच दत्तात्रय टाकळकर यालाही लाकडाने गंभीर मारहाण केली.

घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या मार्गावर होता. पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष घोलप, सचिन गिलबिले, मोहन अवघडे, स्वप्रील गाढवे, निखील गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवित धागेदोरे शोधत आरोपी काशिद याला ताब्यात घेतले. काशिद याने गुन्हयांची कबुली दिली असुन अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश गुरव करित आहे

Web Title: murder of youth by friends twenty rupees drink alcohol kharpudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.