सावकारी वादातूनच इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:24 PM2018-10-03T23:24:15+5:302018-10-03T23:24:37+5:30

प्राथमिक तपासात उघड : दोघांना अटक, मित्रानेच केला घात

The murder of the 'youth' in Indapur taluka from the money laundering issue | सावकारी वादातूनच इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ तरुणाचा खून

सावकारी वादातूनच इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ तरुणाचा खून

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील गोतोंडी येथील अनंता सोपान माने या तरुणाच्या खूनप्रकरणी बुधवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे परत न केल्यामुळेच अनंताचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. अनंताचा मित्र शिवराज हेगडे यानेच रविवारी रात्री दारूच्या नशेत अनंताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : अनंता माने याने २ वर्षांपूर्वी त्याचा निमगाव केतकी येथील मित्र शिवराज हेगडे याच्या मध्यस्थीने तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे राहणारा सावकार सोमनाथ जळक, तसेच अकलूज येथील दीपाली पवार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याने वेळोवेळी त्यांचे पैसे पूर्ण फेडले होते. मात्र, तरीही त्याचा पैशासाठी हे तिघे छळ करीत होते. त्याच्या छळाला कंटाळून तो पुण्याला निघून आला होता. तरीही आरोपींनी त्याचा छळ सुरू ठेवला होता. रविवारी (दि. ३०) सावकाराने अनंता माने याला भेटायला बोलावले होते.
शिवराज हेगडे आणि अनंता दोघेही सोबत दारू प्यायले. यावेळी पैसे देत नसल्याने हेगडे याने अनंताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. दुसऱ्या दिवशी (दि. १) शिवराज हेगडे याने अनंताचे वडील सोपान माने यांना घेऊन अनंताच्या अपहरणाची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. शिवराज अनंताच्या सोबत असल्याने सोमनाथ यांना शंका आल्याने मंगळवारी सोमनाथ माने यांनी सोमनाथ जळक आणि शिवराज हेगडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी रात्री अनंताचा मित्र शिवराज हेगडे याला अटक केली. तसेच बुधवारी दीपाली पवार यांना अटक केली. त्यानंतर ही माहिती उघड झाली. शिवराज हेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार : अनंता माने व शिवराज यांनी निमगाव केतकी येथे (दि. ३०) सकाळी १२ वाजता मद्यपान केले. यानंतर ते दोघे आबा हेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ जाऊन झोपले. अनंता माने झोपेत असताना शिवराजने त्याच्या डोक्यात दगड टाकल्याने त्याचा मृत्यू झाला.

सावकार सोमनाथ जळक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दीपाली मधुकर पवार यांना इंदापूर न्यायालयालयापुढे हजर केले असता तिला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. शिवराज कांतिलाल हेगडे याला ९ तारखेपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The murder of the 'youth' in Indapur taluka from the money laundering issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे