खून करून मृतदेह पेटवला

By admin | Published: July 6, 2017 02:52 AM2017-07-06T02:52:56+5:302017-07-06T02:52:56+5:30

अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले.

Murdered and raised the body | खून करून मृतदेह पेटवला

खून करून मृतदेह पेटवला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. योगेश बबन ठाकूर (वय ३२) रा. ठाकूर पिंपरी (ता. खेड) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे असून जरेवाडी (ता. खेड ) येथे रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह मिळून आला.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मयत योगेश ठाकूर हा आईवडील,भाऊ, पत्नी यांच्यासह ठाकूर पिंपरी येथे एकत्र कुटुंबात राहत होता. घरची शेती व पुणे येथील खासगी फायनान्स कंपनीचे चार वर्षांपासून चाकण या भागाचे कामकाज पाहत होता. दि. ३ जुलै रोजी सकाळी ११वाजता मयत योगेश चाकणला कामाला गेला होता. संध्याकाळी घरी न आल्यामुळे व त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली होती. आज (४ जुलै ) सकाळी १० वाजता हरविल्याची तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात कुटुंबातील सर्वजन आले होते. दरम्यान, गुळाणी-जरेवाडी या रोडच्या कडेला एका तरुणाचे प्रेत पडले आहे. असे पोलिसांनी सांगितल्यावर जाऊन पाहिले असता, हा योगेशचा मृतदेह असल्याची खात्री पटली.
कोणीतरी अज्ञात कारणावरून जिवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून कमरेपासून वरचा भाग जाळून जरेवाडी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. याबाबत मयत योगशेचा आत्तेभाऊ संदीप बाळासाहेब दौंडकर यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव
करत आहे.

Web Title: Murdered and raised the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.