संगीताची साधनाही आॅनलाइन

By Admin | Published: June 21, 2015 12:21 AM2015-06-21T00:21:41+5:302015-06-21T00:21:41+5:30

संगीत शिकायची इच्छा तर आहे; पण कामाच्या व्यापामुळे किंवा दूरदेशात असल्यामुळे चांगल्या गुरूंकडून ते शिकता येत नाही, ही सल मनात कायम असते,

Music is not online too | संगीताची साधनाही आॅनलाइन

संगीताची साधनाही आॅनलाइन

googlenewsNext

प्राची मानकर , पुणे
संगीत शिकायची इच्छा तर आहे; पण कामाच्या व्यापामुळे किंवा दूरदेशात असल्यामुळे चांगल्या गुरूंकडून ते शिकता येत नाही, ही सल मनात कायम असते, त्यांच्यासाठी ‘आॅनलाइन संगीत’ शिकण्याकडे कल वाढू लागला आहे. हे वरदान ठरू लागले आहे. अभिजात भारतीय संगीतातील दिग्गजांनीच ‘आॅनलाइन’ संगीताची एक नवीन परंपरा विकसित केली असून, केवळ विदेशातीलच नव्हे, तर देभरातील युवापिढीचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
एक काळ असा होता की, गुरू-शिष्य परंपरेनुसार गुरूंच्या घरी राहून शिक्षण घेण्याची प्रथा होती; पण कालपरत्वे ही परंपरा लोप पावली. एकाच गुरूकडून शिक्षण घेण्याच्या मानसिकतेमध्येही बदल होत गेला. सध्याच्या आधुनिक जगतात तंत्रज्ञानाचा शिरकाव हा संगीत क्षेत्रातही काहीप्रमाणात झाल्यामुळे ैै‘आॅनलाइन’ माध्यमातून संगीताचे धडे देण्याचा एक नवीन टे्रंड रूजला आहे. त्याला साधना आणि रियाज यांचीही जोड मिळत आहे, हे त्यातील विशेष!
भारतातून जे नागरिक कामानिमित्त परदेशात जातात, त्यांना संगीत शिकण्याची आवड असते किंवा जे अगोदर शिकलेलेही असतात अशाना आपल्या गुरूंकडून परदेशात राहूनही संगीत शिकण्याचा आनंद घेता येतो. परदेशातील नागरिकांना पाश्चात्त्य संगीत काय आहे, यांची माहिती करून घ्यायची असते. बऱ्याच वेळा कामाअभावी ते त्या देशात जाऊन शिकणे शक्य नसते. अशावेळी हे संगीतप्रेमी आॅनलाइन संगीत आपल्या वेळेप्रमाणे शिकतात.
आॅनलाइन संगीत शिक्षण घेण्याची परंपरा ही गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे. त्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. गुरूंनीसुद्धा शिष्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या आवडीनुसार आॅनलाइन संगीत शिकविण्याकडे भर दिला आहे.
आॅनलाइन संगीत शिकविताना गुरूसमोर शिष्य बसला आहे आणि समोरासमोर बसून तो शिकत आहे, असे वाटते. कारण संगीत शिकवत असताना, गुरूंनी आणि शिष्याने कानाला हेडफोन लावलेला असतो, त्यामुळे एकमेकांचा आवाज हा स्पष्ट पणे ऐकायला येतो.

आॅनलाइन संगीत पद्धतीमुळे संगीत शिक्षण घेणे हे अतिशय सोयीस्कर आणि सोपे झालेले आहे. यांमध्ये आॅनलाइन संगीताचे शिक्षणसुद्धा उपलब्ध झालेले आहे. ज्या व्यक्तीला इतर देशात जाणे शक्य नसते, अशासाठी आॅनलाइन शिक्षण हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याची आवडही जपता येते.
- डॉ. विकास कशाळकर, शास्त्रीय संगीतकार

आॅनलाइन संगीत शिकताना शिष्याला संगीताची बेसिक माहिती पाहिजे. त्यामुळे आॅनलाइन संगीत शिकविताना अडचण येत नाही. एखादा शिष्य जर परदेशात गेला असेल, त्यांच्यासाठी आॅनलाइन शिक्षण एक वरदान आहे. दोन्ही प्रकारचे संगीत शिक्षण हे गुरुमुखी असते, त्यामुळे आॅनलाइन संगीत हा उत्तम पर्याय आहे. तसेच, शास्त्रीय संगीत हा संगीत शिक्षणातला पाया असल्यामुळे, जास्तीत जास्त लोक हे शास्त्रीय संगीताचे शिक्षण आॅनलाइन घेत आहेत.
- धनंजय दैठणकर, संतुरवादक

Web Title: Music is not online too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.