मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 01:12 PM2020-04-25T13:12:20+5:302020-04-25T13:14:36+5:30

आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव मशिदीत गर्दी करता येणार नाही 

Muslim brothers should offer Namaz from home: Appeal by Joint Commissioner of Police Dr.Ravindra Shiswe | मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन 

मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन 

Next
ठळक मुद्देकोरोनाला अटकाव करण्यासाठी कुठल्याही धार्मिक स्थळांवर गर्दी करता येणार नाही असा आदेश फिजिकल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे, घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच सुरुवात झालेल्या रमजान महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांनी यापुढील काळात घरातुनच नमाज अदा करावा अशा सूचना देण्यात आल्याची अशी माहिती पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. 
कोरोनाला अटकाव करण्यासाठी कुठल्याही धार्मिक स्थळांवर गर्दी करता येणार नाही. असा आदेश यापूर्वी 23 मार्च काढण्यात आला आहे. त्याला दोन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. त्यात सर्व धार्मिक स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत संबंधित कमिटीशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सवोर्तोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यत मुस्लिम बांधवांनी देखील अतिशय उत्तमरित्या पोलिसांना सहकार्य केले आहे. कायद्याचे पालन केले आहे. यापुढील काळात देखील फिजिकल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. त्यासाठी जे नियम व अटी सांगण्यात आल्या आहेत त्याचे पालन सवार्नी करणे गरजेचे आहे. 
कुणालाही सामुदायिक प्रार्थना यावेळी करता येणार नाही. विनाकारण कुठेही फिरता येणार नाही. तेव्हा नागरिकांनी घरात राहावे, घरातून बाहेर पडू नये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अशाप्रकारचे निर्णय घेणे गरजेचे आहे. ते नागरिकांच्या हितास्तव आहेत. असेही डॉ. शिसवे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Muslim brothers should offer Namaz from home: Appeal by Joint Commissioner of Police Dr.Ravindra Shiswe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.