मुस्लिम समाजाने रक्तदान करून जपले ‘रक्ताचे नाते’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:09+5:302021-07-19T04:09:09+5:30
पुणे : मुस्लिम समाजाने सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सक्रिय सहभाग नोंदविला. देशात प्रथमच मशिदीमध्ये ...
पुणे : मुस्लिम समाजाने सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सक्रिय सहभाग नोंदविला. देशात प्रथमच मशिदीमध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शेकडो मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून ‘रक्ताचे नाते’ जपले.
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी बंधुभाव भाईचारा फाऊंडेशचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख, नूर-ए-हिरा मशिदीचे अध्यक्ष हाजी जकेरीया मेमन, पुणे शहर तांबोळी समाज, अध्यक्ष हाजी नजीर तांबोळी, हाजी नूर सय्यद धायरिवाले, हाजी बाजील शेख, हाजी सादिक शेख, हाजी नजीर सय्यद, अब्दुल वहाब शेख, जकीउद्दीन शेख, मोहसीन हसन शेख आदी उपस्थित होते.
फाऊंडेशनचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख यांनी समाजातील तब्बल २२ संघटनांशी संपर्क साधून शिबिर आयोजित केले. गंगाधाम चौकात असलेल्या ''नूर-ए-हिरा'' मशिदीमध्ये शिबिराची व्यवस्था केली होती. दिवसभरात १२६ स्त्री-पुरुषांनी रक्तदान केले.
----
कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे केली. या उपक्रमात ''लोकमत''ने आम्हाला सहभागी करून घेतले त्याबद्दल धन्यवाद. देशावर कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी मुस्लिम समाज कायम समोर येतो.
- शब्बीरभाई शेख, अध्यक्ष, बंधुभाव-भाईचारा फाऊंडेशन
-----
मुस्लिम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होत आहे. आज ‘लोकमत’ आणि संपूर्ण मुस्लिम समाजाने एकत्र येत नवे नाते निर्माण केले आहे. आज एकमेकांना एकमेकांचे रक्त देऊन प्राण वाचविले जात आहेत. ही मानवतेची सेवा आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली ही शिकवण आणि संदेश आज पुन्हा एकदा मशिदीमधून देण्यात आम्हाला आनंद वाटतो आहे.
- हाजी जकेरीया मेमन, अध्यक्ष, नूर - ए - हिरा मस्जिद
----
आपण सर्व भारतीय आहोत आणि ही आपली मातृभूमी आहे. या नात्याने आपण सर्व बांधव आहोत. त्यामुळे आपल्याच बांधवांसाठी रक्त देताना आम्हाला गौरव वाटतो आहे. विशेष म्हणजे आमच्या महिला देखील आज घराबाहेर पडल्या आणि रक्तदान केले. ‘लोकमत’ने हा अभिनव उपक्रम राबवित सामाजिक एकतेचे नवे नाते प्रस्थापित केले आहे.
- हाजी नजीर तांबोळी, अध्यक्ष, पुणे शहर तांबोळी समाज
-----
नूर-ए-हिरा मशिदीमध्ये झालेल्या रक्तदान शिबिराचा आदर्श घेत येत्या काही दिवसात पुण्याच्या विविध भागात असलेल्या मशिदीमधून रक्तदान शिबिर घेण्याची तयारी स्थानिक ट्रस्टीनी दर्शविली आहे.
------
सहभागी संस्था आणि पदाधिकारी -
मोहम्मदिया मस्जिद, लोहियानगर
जाकिर शिकलगार, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र मायनाॕरिटी एनजीओ फोरम
सलिम पटेकरी, संस्थापक संचालक, लोकसेवा सोशल फाऊंडेशन
सलिम गुलजार शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती
जावेद खान, अध्यक्ष, उम्मत फाऊंडेशन
मोहसीन हसन शेख आणि मित्र मंडळ, कोंढवा,
गफ्फार सागर, रेहमुद्दीन शेख, तुफेल शेख, यासिन शेख, आतिक शेख, शब्बीर शेख, सोहेल इनामदार, अब्दुल्ला सुभेदार, असीम बानेकर
----