सीएए आणि एनआरसी विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 07:09 PM2019-12-20T19:09:25+5:302019-12-20T19:45:19+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विराेधात पुण्यात मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयावर माेर्चा काढण्यात आला हाेता.
पुणे : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व संशोधन विधेयकाचा विरोध केला जात आहे. आज पुण्यात मुस्लिम समाजाकडून पुण्यातील जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. यावेळी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी उपस्थितांना संबोधित केले.
"हिंदुस्थान में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हें !", "सेव्ह कॉन्स्टिट्युशन रिजेक्ट कॅब" असे लिहिलेले फलक हातात धरण्यात आले होते. त्याचबरोबर भारताचा झेंडा देखील यावेळी मोर्चात आणण्यात आला होता. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैण्यात करण्यात आला होता.
कॅम्प भागातील बाबाजान दर्ग्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तेथून कॅम्प भागातील आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी जिल्हाधिकार्यालयासमोरील रस्ता बंद करण्यात आला होता. मोर्चाच्या आयोजकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
संविधानाच्या विरोधात जाणाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढू. मुसलमान कुठल्याही कायद्याला घाबरात नाही. मुसलमान कागदी भारतीय नाहीत तर खरे हिंदुस्थानी आहेत. अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.