बारामती नगरपालिकेसमोर मुस्लिम समाजाचे चक्री उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:44 PM2018-07-02T18:44:23+5:302018-07-02T18:47:35+5:30

एकाच कबरीमध्ये चार-पाच वेळा दफनविधी करावा लागतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होते.

Muslim Movement Against Baramati Municipal Council | बारामती नगरपालिकेसमोर मुस्लिम समाजाचे चक्री उपोषण 

बारामती नगरपालिकेसमोर मुस्लिम समाजाचे चक्री उपोषण 

Next
ठळक मुद्देअल्पसंख्यांक समाजाचा निधी : दुसरीकडे वापरल्याचा होतोय आरोप

बारामती : अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आलेला निधी बारामती नगरपालिका दुसरीकडेच वापरत आहे, असा आरोप करीत बारामतीमधील मुस्लिम समाजाने बारामती नगरपालिकेच्या विरोधात सोमवार (दि. २) पासून नगरपालिकेच्या इमारतीसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. 
शहरात मुस्लिम समाजाची संख्या वाढत आहे. मात्र नगरपालिकेने अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपालिका अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी असणारा निधी दुसरीकडेच वापरत आहे. याबाबत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला तरी देखील दखल घेतली जात नाही, तसेच मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप मुस्लिम समाजाने केला आहे.
मुस्लिम समाजासाठी शहरामध्ये दोन एकर जागा दफनभूमीसाठी द्यावी, बहुद्देशीय सभागृह बांधून द्यावे, शहरातील उर्द शाळेत १२ वी इयत्तेपर्यंत करावी व त्यासाठी इमारत बांधुन द्यावी, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी मंजुर झालेला निधी फक्त त्याचा समाजासाठी वापरावा, बारामती शहरामध्ये वक्त बोर्डाच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने काढावीत, अशा मागण्या मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांना देण्यात आले आहे. 

......................

एकाच कबरीमध्ये करावा लागतो चार-पाच वेळा दफन विधी
शहरात मुस्लिम समाजाच्या जागेवरच दफनभूमी आहे. त्यावरच आतापर्यंत दफनविधी होत आले आहेत. ही जागा सध्या तोकडी पडत आहे. एकाच कबरीमध्ये चार-पाच वेळा दफनविधी कारावा लागतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होते. नगरपालिकेने  दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिलेली जागा खंडोबानगरमधील नदीपात्रामध्ये आहे. मात्र याठिकाणी अंत्यविधी कराताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मुस्लिम सामाजाच्या लोकसंख्येचा विचार करून शहराच्या वाढीव हद्दीमध्ये कमीतकमी एक एकर जागा दफनभूमी करता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 

Web Title: Muslim Movement Against Baramati Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.