यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:43+5:302021-02-08T04:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तम करा. कोणताही व्यवसाय हा उत्तम कौशल्य, गुणवत्ता पूरक, ...

Must be the best to become a successful entrepreneur | यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तम करा. कोणताही व्यवसाय हा उत्तम कौशल्य, गुणवत्ता पूरक, टीकाऊपणा आणि सातत्य यावर अवलंबून असतो. आव्हानांची पातळी सातत्याने बदलत आहे. ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेऊन पूरक कृती केली तर निश्चितपणे स्वप्न साकार होते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक आणि ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी ग्रुप) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केले.

निमित्त होते, ‘बिझ आयुरिस फाउंडेशन’ प्रकाशित जितेंद्र गुप्ता लिखित ‘अ रोड मॅप फॉर एन्टरप्रिनर’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.

‘ग्रँड एक्झॉटिका बिझनेस हॉटेल’, चिंचवड येथे शनिवारी (दि. ६) हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी कल्याणी तुळजापूरकर, रसना जयतस्वाल, दीपक परबत, कैलाश पिंजाणी, विक्रांत भुजबळराव, वत्संक प्रजापती , गौरव कुमार, लालबाबू गुप्ता आदी तज्ज्ञ उपस्थित होते.

‘बिझ आयुरीस फाउंडेशन’चे संचालक जितेंद्र गुप्ता म्हणाले, उद्योजक होण्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा हे उद्दिष्टय ठेऊन केला तर फार काळ टिकत नाही. व्यवसाय करताना आव्हान पेलण्याची क्षमता, नवीन शिकण्याची आवड आणि उत्तम कौशल्य आवश्यक आहे. मार्गदर्शन घेऊन अभ्यासपूर्ण केलेला व्यवसाय उत्तमरित्या चालू शकतो आणि तो अनंत काळापर्यंत टिकतो. उद्योजकीय मानसिकता, वैचारिकता व अर्थपूर्ण जोखीम यावर व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असते. त्यासाठी लागते ते फक्त मार्गदर्शन जे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे.

अंजली मिस्त्री आणि किशोर काळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Must be the best to become a successful entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.