mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:53 AM2018-09-28T01:53:31+5:302018-09-28T01:53:45+5:30

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

mutha canal: take action against responsible officers | mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

googlenewsNext

पुणे : शहरातील कालवाफुटीच्या दुर्घटनेची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी केली.
सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मुठा उजवा कालवा सकाळी सव्वाआकरा वाजता फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.
या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. या दुर्घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत महापालिका तसेच जलसंपदा विभागाने आपले हात वर केले. या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या सर्व प्रकाराला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार असून, कालव्याच्या भिंतीची अवस्था चांगली नाही, तातडीने त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनास दिल्यानंतरही याची कोणतीही दखल अधिकाºयांनी घेतली नसल्याचा आरोप केला.
खडकवासला ते पर्वती हे बंद पाइपलाइनचे काम करताना काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे जलसंपदा विभागाने कळवून देखील पालिकेतील अधिकाºयांनी याकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला. याला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली.
मुठा उजवा कालव्याला भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलली आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या राहण्याची तसेत खाण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.
या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शहरातून जाणाºया कालव्यांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

अनधिकृत केबल खोदाईची चौकशी करा
ज्या ठिकाणी हे भगदाड पडले आहे, तेथे काही कंपन्यांच्या केबल आहेत. त्यामुळे तेथील जमीन भुसभुशीत झाली आहे, या कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.

कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी कोणाच्या फायद्यासाठी सोडले जात होते, याची चौकशी झाली पाहिजे. पालिकेला कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात असताना १३०० क्युसेक्स पाणी कोणाच्या आदेशाने सोडले जात होते.
- अरविंद शिंदे, काँगे्रसचे गटनेते

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना...
स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दर्लक्ष केले जाते. यामुळेच ही दुर्घटना झाली असून, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
- श्रीनाथ भिमाले, महापालिका, सभागृह नेते

Web Title: mutha canal: take action against responsible officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.