मुठा नदीकाठी फुलणार देवराई टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट परिसरात देवराईची निर्मिती : १०० विविध प्रकारची देशी झाडे आणि रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:58+5:302021-02-23T04:14:58+5:30
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, लायन्स क्लब पूना सिटीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय ...
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, लायन्स क्लब पूना सिटीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, रघुनाथ ढोले, शंकर महाराज मठाचे अध्यक्ष भगवान खेडेकर तसेच राजा बलकवडे, डॉ. मदन कोठुळे, आळंदी देवस्थानचे चोपदार, रामभाऊ रणदिवे, ट्रस्टचे नरेंद्र गाजरे,बाळासाहेब ताठे, महेश अंबिके,रमेश मणियार उपस्थित होते.
विविध प्रकारची १०० देशी झाडे या वेळी लावण्यात आली. यामध्ये काटेसावर, पांगारा, पळस, बकुळ, ताम्हण, पिंपळ, उंबर, जांभूळ, जास्वंद, मोगरा आदींचा समावेश आहे.
दीपक थोरात म्हणाले, देवराई उपक्रमांतर्गत मंदिराच्या मागे ८० देशी रोपे आणि २० फुलझाडे लावली आहेत. यामुळे पक्षी, किडे, मुंग्या यांच्यासाठी नदीकाठच्या जागेत एक चांगली देवराई निर्माण होईल. तसेच मंदिरातील निर्माल्याचा वापर खत म्हणून होईल.
रघुनाथ ढोले म्हणाले, निसर्गाकडून जे घेतले आहे, ते परत केले पाहिजे. यासाठी निसर्गाचा अभ्यास करा. जिथे शक्य आहे तिथे देवराई निर्माण करा. देवराई निर्माण करण्यासाठी पैसे नाही तर श्रम लागतात. झाडे ही शाश्वत श्रीमंती आहे. ही संपत्ती वाढवायची असेल एक झाड तोडण्याआधी विचार करायला पाहिजे, आणि त्याच्या तिप्पट झाडे लावायला हवीत.