माझा व्यवसाय-माझा हक्क उपक्रमातून दोनशेपेक्षा जास्त तरुणांना रोजगार देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:11+5:302021-03-26T04:12:11+5:30
: गावा-गावांतील युवकांशी थेट संवाद -- इंदापूर : इंदापूर तालुक्यातील होतकरू तरुणांच्या हाताला हक्काचे काम देण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन,राज्यमंत्री ...
: गावा-गावांतील युवकांशी थेट संवाद
--
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील होतकरू तरुणांच्या हाताला हक्काचे काम देण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत माझा व्यवसाय, माझा हक्क या उपक्रमातून ग्रामीण भागातील दोनशे तरुणांना रोजगार देणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव व युवा नेते श्रीराज भरणे यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी : इंदापूर तालुक्यातील होतकरू तरुणांना फिरता व्यवसाय करण्यासाठी, तीन चाकी तसेच चार चाकी पिक अप सारखे वाहन घेण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत "माझा व्यवसाय ,माझा हक्क या उपक्रमाचे इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून, होतकरू तरुणांना पिक अप टाईप वाहन, घेण्यासाठी जवळपास ९५ टक्के कर्ज मिळणार असून, यामध्ये ओपन, ओबीसी, एन.टी या वर्गाला (पुरुष)२५ टक्के व महिला तसेच अनु.जाती वर्गाला ३५ टक्के सबसिडी मिळणार आहे. यासंदर्भात, इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे तालुक्यातील युवकांना मार्गदर्शन तसेच कागदपत्रे यासंदर्भात माहिती पुरवली जात आहे. बेरोजगारांना रोजगार अशी ही अनोखी संकल्पना राबवली जात आहे.